Saturday, January 18, 2025

Latest Posts

पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही , आपला बॉस सागर बंगल्यावर  बसला आहे

आमदार नितेश राणे यांचं चिथावणीखोर विधान : वडेट्टीवार म्हणाले हीच का मोदी की गॅरंटी

| TOR News Network | BJP MLA Nitesh Rane : भाजपाचे आमदार नितेश राणे यांची जीभ अनेकदा घसरली आहे.या पूर्वी देखील त्यांनी अनेकांवर टिपणी करताना खालची पातळी गाठली असल्याचे अनेक उदाहरण आहेत.मात्र यंदा त्यांनी थेट पोलीसांसंदर्भात वादग्रस्त भाष्य केले आहे.त्यांनी अकोला जिल्ह्यातील निंबा फाटा येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या सभेत पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही.(Police cannot do anything to me) आपला बॉस सागर बंगल्यावर  बसला आहे, असे चिथावणीखोर विधान केलं आहे. (Our boss is sitting on Sagar bungalow)त्यावर आता हीच का मोदी की गॅरंटी अशा शब्दात विराधकांनी टीका करणे सपरु केले आहे. (BJP Mla Nitesh Rane Controversial statement in Akola)

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा पोलिसांसंदर्भात वादग्रस्त विधान केलंय. हे पोलीस माझं काही बिघडवू शकत नाही, असं नितेश राणेंनी म्हटलंय. माझे कितीही व्हिडिओ काढले तरी पोलीस ते व्हिडीओ फक्त बायकोलाच दाखवतील असंही नितेश राणे म्हणालेत.(Nitesh Rane Controversial Statement On Police)

भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा पोलिसांविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. अकोला जिल्ह्यातील निंबा फाटा येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या सभेत नितेश राणे बोलत होते. माझ्या कुठल्याही वक्तव्यावर पोलीस माझं काही बिघडवू शकत नाही. ते व्हिडिओ काढतायेत पण घरी जाऊन फक्त बायकोला दाखवतील,(They can take videos but will show it only to wife) असं धक्कादायक विधान नितेश राणे यांनी केलं. (Nitesh Rane Shocking statement)

 पोलिस मला काही करु शकणार नाही

“मला काही करु शकणार नाही. पोलिसांना माझे भाषण रेकॉर्ड करु दे. जास्तीत जास्त बायकोला दाखू शकणार आणि काही करु शकणार आहे. आमच्या राज्यात आमच्यावर काय करु शकाल. जागेवर राहायच आहे. राजरोस पद्धतीने पाहिजे तिथे तुमच्या इथे अतिक्रमण सुरु आहे,” असे नितेश राणे म्हणाले.”तुम्ही काही चिंता करु नका. हे सरकार हिंदुत्ववाद्याचे आहे. सरकारमध्ये असे पर्यंत कुठल्याही हिंदूला कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही अशी ताकद आम्ही हिंदूंच्या मागे उभी केली आहे,” असेही नितेश राणे म्हणाले.

 पोलिसांना आव्हान देणारी हीच का भाजपची संस्कृती

या व्हिडीओवरुन काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सत्ताधारी भाजप आमदाराची भाषा बघा..पोलिस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील, पण कुणी माझं वाकड करू शकणार नाही. महिलांचा अपमान करणारी, राज्यातील पोलिसांना आव्हान देणारी ही स्क्रिप्ट भाजपने दिली का? महिलांचा अपमान करणारी, पोलिसांना आव्हान देणारी हीच का भाजपची संस्कृती? हीच का मोदी की गॅरंटी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपुढे ही भाषा?,” असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Latest Posts

Don't Miss