Monday, November 18, 2024

Latest Posts

नऊ मंत्री, एक गृहमंत्री आणि एक अकेला सब पर भारी

| TOR News Network |

Sanjay Raut Latest News : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे नुकतेच संसदेत झालेले भाषण सध्या मोठ्या प्रमाणात गाजत आहे. त्यांनी यात केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. (Rahul Gandhi Slams Bjp) राहुल गांधी यांनी अग्निवीर योजना, हिंदुत्व आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर आरोप केले. जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात आणि 24 तास हिंसा आणि द्वेष पसरवतात, ते हिंदू नाहीत, असे वक्तव्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले.(Rahul Gandhi on Hindu) राहुल गांधी यांच्या भाजपवरील या आरोपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आक्षेप घेतला.(Amit Shah Objection On Rahul Gandhi) आता यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींची पाठराखण केली आहे.(Sanjay Raut support Rahul Gandhi)

“नऊ मंत्री, एक गृहमंत्री आणि एक अकेला सब पर भारी म्हणजे नरेंद्र मोदी या सर्वांना काल राहुल गांधी भारी पडले. मजबूत विरोधी पक्ष आणि प्रामाणिक विरोधी पक्षनेता काय असतो, हे काल देशाला पहिल्या दिवशी दिसलं. (Rahul Gandhi Leader of Opposition) ही सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या”, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले.(Sanjay Raut On Rahul Gandhi)

“प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हिंदुत्वाचे सर्वात मोठे गुरु शंकराचार्य यांना आमंत्रित केले गेलं नाही. त्यांनी हिंदुत्वावर गप्पा माराव्यात. काल राहुल गांधींचे भाषण हे देशाला दिशादर्शक आणि मार्गदर्शक होतं. राहुल गांधी यांनी भाजपच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा उतरवला. राहुल गांधी यांनी काल काय चुकीचं सांगितलं. आम्ही हिंदुत्व सोडलं, शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, असा आरोप भाजप नेहमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी करतं. तेव्हा उद्धव ठाकरे जे उत्तर देतात, तेच उत्तर राहुल गांधींनी दिलं”, असेही संजय राऊत म्हणाले.

आजही संसदेत पुन्हा खडाजंगी ?

राहुल गांधींच्या भाषणातला मोठा भाग हटवण्यात आला आहे. राहुल गांधींच्या भाषणातील नरेंद्र मोदी, आएसएस, भाजपवरचा भाग नोंदीतून काढून टाकण्यात आल्याची माहिती आहे. राहुल गांधींच्या लोकसभेतल्या भाषणाला कात्री लावल्यामुळे आजही संसदेत पुन्हा खडाजंगीची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss