Monday, January 13, 2025

Latest Posts

निलेश लंकेची खासदारकी अडचणीत

| TOR News Network |

Nilesh Lanke Latest News : यंदा लोकसभेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी हायव्होल्टेज लढत पहायला मिळाली. यात नगर उत्तर दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गट व भाजपात थेट सामना रंगला होता.( Nagar North South Constituency) पवार गटाकडून निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखे पाटील यांना आवाहन दिले होते.(Nilesh Lanke VS Sujay vikhe Patil) अशात विखे यांना पराभूत करत लंके यांनी बाजी मारली. लंके २८ हजार मतांनी विजयी झाले.मात्र सुजय विखेंना हा पराभव अजूनही मान्य नसल्याचे दिसत आहे. त्यांनी या निकालावर आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. (Sujay Objecting to the verdict) या याचिकेवर मंगळवारी (ता.६) सुनावणी पार पडली. ( hearing on Sujay petition) सुजय विखेंनी जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत निलेश लंके निवडून आल्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निलेश लंके यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिल्याने निलेश लंकेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Notice To Nilesh Lanke by Aurangabad Bench of Bombay High Court) सुजय विखेंनी खासदार लंकेविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने लंकेंसमोर लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आता कायदेशीर लढाई जिंकण्याचंही आव्हान निर्माण झालं आहे. हे आव्हान निलेश लंके कसे पार करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचा  २८  हजार मतांन पराभव करत निलेश लंके जायंट किलर ठरले होते. त्यानंतरही लोकसभेत इंग्रजी भाषेत शपथ घेऊन निलेश लंकेंनी सुजय विखेंच्या टीकेला अप्रत्यक्षत्ररित्या चपराकच दिली. (Nilesh Lanke Oath In English) पण लोकसभा निवडणुकीतील पराभव विखे पाटलांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यांनी निलेश लंकेंविरोधात कायदेशीर लढाईचे आव्हान उभे करत न्यायालयात धाव घेतली आहे.

या याचिकेवर आता २ सप्टेंबरला सुनावणी  होणार आहे.(Next Hearing on 2 September) पण उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निलेश लंकेंना नोटीस बजावण्याचे आदेश दिल्यामुळे लंकेंचं टेन्शन वाढलं आहे. या याचिकेतून विखेंनी निलेश लंकेंवर गंभीर आरोप केले आहेत. नगरमधील लढतीत ४० ते ४५ केंद्रांवरील मतमोजणी योग्य पद्धतीने करण्यात आली  नसल्याचा आरोप विखेंनी या याचिकेत केला आहे.

Latest Posts

Don't Miss