| TOR News Network |
Nana Patole On CM Post : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्या बद्दल वक्तव्य केले आहे. (Nana Patole On Upcoming CM) यावर बोलताना पटोले म्हणालेत सध्या काँग्रेस राज्यात मोठा पक्ष आहे. (Congress Big Brother in Mahavikas Aghadi) आमच्याकडं सदतीस आमदार आहेत, तर तेरा खासदार निवडून आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीतही, आमच्या पक्षाला अशाच पद्धतीनं यश मिळालं. (Patole on Congress Success) जनतेचा प्रतिसाद मिळाला, तर निश्चितच काँग्रेस मोठा भाऊ होऊ शकतो. त्यामुळं काँग्रेसनं मुख्यमंत्री पदाची अपेक्षा करणं, गैर नाही व नशिबात असेल, तर पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचा होईल असं ही ते म्हणाले.(Next Cm Will Be Of Congress)
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी तसंच महायुतीनं प्रचाराची तयारी सुरू केलीय.(Vidhansabha Elections 2024) राज्य सरकारनं मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आणल्या आहेत.(Maharashtra Government Scheme) या योजना फसव्या असल्याचा प्रचार महाविकास आघाडीकडून सुरू आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? असा सवाल महायुतीकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांनी अद्याप स्पष्टीकरण दिलं नाहीय. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या शर्यतीत उतरल्याचं पाहायला मिळतय.(Nana Patole In CM Post Race)
या संदर्भात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते तुषार रसाळ म्हणाले, विधानसभा निवडणुकानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. (UBT Shivsena on Cm Post) तोपर्यंत महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न, समस्या याकडंच आम्ही लक्ष देत आहोत. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल, यावर उद्धव ठाकरे यांनीच ‘महाराष्ट्रातील जनता’ असं यापूर्वीच सांगितलं आहे. मात्र महाराष्ट्रातील जनतेला उद्धव ठाकरे, पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत, (UBT Shivsena Claim Uddhav Thackeray As CM ) हे वारंवार सिद्ध झालं आहे. संजय राऊत यांनीही या संदर्भात सूतोवाच केलं आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकांसाठी प्रत्यक्षात महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला, नसला तरी प्रत्येक पक्षाला अपेक्षा असणं गैर नाही. शेवटी निर्णय जनतेच्या हातात आहे, असंही ते म्हणाले.
या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे म्हणाले की, पटोले यांच्या चाहत्यांनी भावना व्यक्त करण्यात काही गैर नाही.(Sharad Pawar Group On Cm post) मात्र संसदीय लोकशाही पद्धतीत मुख्यमंत्री पदाचा किंवा सरपंच पदाचा चेहरा आधी जाहीर करून निवडणूक लढवण्याची पद्धत नाही. महाविकास आघाडी संसदीय लोकशाही प्रमाणे वागते. त्यामुळं आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणार नाही. निवडून आलेले आमदार आपला नेता निवडतील. त्यामुळं आमच्यासाठी हा प्रश्नच नाही, असंही लवांडे म्हणाले.