Saturday, January 11, 2025

Latest Posts

नव्या वर्षात बँकींग, सिम कार्ड, आधारच्या नियमांत बदल

Banking, Sim Card , Aadhar New Rule Updates 2024 : २०२४ या नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. नवीन वर्षामध्ये सर्वसामान्यांना प्रभावित करणाऱ्या नियमांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये सिम कार्ड ते इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) संबंधित नियमांचा समावेश आहे. चला तर जाणून घे घेऊया काय आहेत हे नियम…

वर्षभरापासून व्यवहार नसलेली UPI आयडी होणार बंद

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआय ने आपल्या नवीन मार्गदर्शक तत्वात नमूद केले आहे की, जर UPI वापरकर्त्याने त्याच्या UPI आयडी वरून एक वर्ष कोणताही व्यवहार केला नाही तर त्याची UPI आयडी बंद केली जाईल. एका वर्षाच्या कालावधीत ग्राहकाने त्याच्या खात्यातील शिल्लक तपासली तरी त्याचा आयडी ब्लॉक केला जाणार नाही.

आयकर रिटर्न भरणे

जे करदाते आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये त्यांचे आयकर विवरणपत्र भरण्यात अपयशी ठरले आहे त्यांना आजपासून बिलेटेड रिटर्न भरण्याचा पर्याय नाही. याव्यतिरिक्त, त्यांच्या रिटर्नमध्ये त्रुटी असलेल्या व्यक्ती देखील सुधारित रिटर्न सबमिट करण्यास अक्षम असतील.

सिम कार्ड घेणे होणार कठीण

नवीन दूरसंचार विधेयकाच्या अंमलबजावणीसह, १ जानेवारी २०२४ पासून सिम कार्ड खरेदी आणि कायम करण्याची प्रक्रिया देखील बदलत आहे. ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी, सरकार सिम कार्डच्या विक्री आणि खरेदीवर नियंत्रण ठेवणारे कठोर नियम लागू करत आहे. आता सिम कार्ड मिळविण्यासाठी डिजिटल नो युवर कस्टमर (केवायसी) प्रक्रिया अनिवार्य आहे. दूरसंचार कंपन्यांना सिम कार्ड संपादन प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना बायोमेट्रिक डेटा प्रदान करणे आवश्यक असेल. बनावट सिमकार्ड बाळगल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ३० लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. याशिवाय, सिम विक्रेते आता संपूर्ण पडताळणीनंतरच सिम विकू शकतील. सिमकार्डच्या मोठ्या प्रमाणात वितरणावरही बंदी घालण्यात येणार आहे.

आधार कार्ड तपशीलांमध्ये बदल

आधार कार्ड तपशीलांमध्ये विनामूल्य बदल करण्याची अंतिम तारीख देखील ३१ डिसेंबर २०२३ होती. अशा परिस्थितीत, आजपासून आधार कार्डमध्ये वैयक्तिक तपशील बदलू इच्छिणाऱ्या लोकांना ५० रुपये भरावे लागतील.

जानेवारीत १६ दिवस बँक बंद

जानेवारी महिन्यात बँकांना बंपर सुट्ट्या आहेत आणि जानेवारी २०२४ मध्ये बँका १६ दिवस बंद राहतील. या सुट्ट्यांमध्ये प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) वगळता साप्ताहिक रविवार आणि शनिवार सुट्ट्यांचा समावेश आहे.

Latest Posts

Don't Miss