Thursday, January 16, 2025

Latest Posts

विधानसभेच्या जागेवरुन महायुतीत आता नवा पेच

| TOR News Network |

Mahayuti Latest News : लोकसभेत झालेली पिछेहाट बघता आता महायुती बारकाईने विचार करत पावले टाकत आहे. पुढे होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकांसाठी उमेदवार निवडताना त्याचा सखोल अभ्यास केला जात आहे. अशात आता महायुतीतील घटक पक्षांना मोठा भाऊ म्हणून भाजप किती जागा देणार हे अध्याप स्पष्ट झाले नसले तरी महायुतीतले पक्ष आपले जागांवरुन आपले दावे ठोकत आहे.(Bjp on Alert mode for vidhan sabha) भाजप,राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरु असताना आता त्यात एका घटकपक्षाने नवी मागणी केल्याने महायुतीत नवा पेच निर्माण झाले आहे.(Mahayuti Seat Sharing in trouble)

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी एक मोठी मागणा केली आहे.(Mahadev Jankar Big Demand) राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची काही भागात ताकद आहे. आता विधान परिषदेला जानकरांना संधी देण्यात आलेली नाही. (Mahadev Jankar Ignored For vidhanparishad) दोन वेळा आपल्याला संधी देण्यात आली होती. त्यामुळे आपण समाधानी असल्याचे जानकर म्हणाले. आता नव्या लोकांना संधी दिली पाहीजे असेही ते म्हणाले. लोकसभेला पराभूत झालो असलो तरी विधानसभा निवडणूक लढणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. असे असले तरी राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीत 20 जागा मिळाव्यात अशी मागणी जानकर यांनी केली आहे.(Mahadev Jankar Demand 20 seats for vidhansabha) त्यामुळे आधीच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच जागा वाटपा वरून रस्सीखेच सुरू आहे. त्यात आता जानकरांनी आपली मागणी रेटली आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्या समोर आता पेच निर्माण झाला आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचा लोकसभेत पराभव झाला. त्यानंतर त्यांचे विधान परिषदेवर पुनर्वसन केले जाईल अशी अपेक्षा होती. एकीकडे पंकजा मुंडे यांचाही लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यांचे पुनर्वसन विधान परिषदेत केले गेले.(Pankaja munde on vidhanparishad) त्यामुळे जानकरांनाही तीच अपेक्षा होती. पण त्यांच्या ऐवजी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली. जानकर यांचा पत्ता कट झाला. अशा वेळी जानकर यांनी महायुती समोर मोठी मागणी ठेवली आहे.(Mahadev Jankar Big Demand to mahayuti) त्यामुळे महायुतीतल्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा समोर पेच निर्माण झाला आहे. जी मागणी जानकरांनी ठेवली आहे त्यामुळे गुंतागुंत वाढण्याची दाट शक्यता आहे.

महादेव जानकरांनी परभणी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. पण त्यांना त्यात अपयश आले. जवळपास एक लाखा पेक्षा जास्त मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर जानकरांचे काय होणार असा प्रश्न होता. त्यांची वर्णी राज्यसभा किंवा विधान परिषदेवर लावली जाईल अशी चर्चा होती. ते दोन टर्म विधान परिषदेवर राहीले आहेत. शिवाय फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री सुद्धा राहीले आहेत. जानकरांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे. खास करून धनगर समाज मोठ्या प्रमाणात जानकरांच्या मागे आहे.(Dhangar Samaj Leader Mahadev Jankar) त्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहाता जानकरांना दुखवणे भाजपला परवडणारे नाही. त्यामुळे जानकरांना विधान परिषदेवर पाठवले जाईल अशी चर्चा होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे आता जानकरांनी नवे फासे टाकले आहेत. अशा स्थितीत महायुती समोर मोठा पेच निर्माण झाला आहे. वीस जागांची मागणी त्यांनी केली आहे. त्यात त्यांच्या वाट्याला किती जागा येणार हे पाहावं लागणार आहे.

Latest Posts

Don't Miss