Sunday, January 12, 2025

Latest Posts

बदलापूरच्या घटनेनंतर शाळेंसाठी नवे नियम

| TOR News Network |

Badlapur Case Latest News : बदलापूरच्या घटनेपासून धडा घेत सरकारने मोठी घोषणा केली आहे. मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काही नव्या नियमांची घोषणा केली आहे. (New Rules For School After Badlapur Case) काल बदलापूर येथील नामांकीत शाळेत घडलेल्या घटनेनतंर जनसामान्यांमध्ये संतापाची भावना आहे. शाळेच्या स्वच्छतागृहात स्वच्छता कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केला. काल बदलापूर येथे या घटनेविरोधात मोठं जन आंदोलन झालं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे आंदोलन सुरु होतं.(Badlapur Andolan) त्या शाळेच्या परिसरात मोठा जमाव जमला होता. रेल्वे स्टेशनवर लोक आंदोलनाला बसले होते. पोलिसांवर दगडफेक झाली. रेल्वे रुळावरुन आंदोलक हटत नसल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. बदलापूरमधील या जनआक्रोश आंदोलनाने सरकारला हलवून सोडलय.हे सर्व बघता आता सरकारने शाळांसाठी नियम केले आहेत.

सरकार डॅमेज कंट्रोलच्या मोडमध्ये आहे.(Maha Govt To Damage Cantrol on Badlapur Case) बदलापूरच्या शाळेत घडलेल्या घटनेपासून धडा घेत मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मोठी घोषणा केली आहे.( mumbai guardian minister mangal prabhat lodha order verification of every school ) बदलापूरच्या शाळेत जे घडलं, तसं पुन्हा होऊ नये म्हणून सरकारने हे पाऊल उचललय. सरकार डॅमेज कंट्रोलच्या प्रयत्नात आहे. दुसऱ्याबाजूला या घटनेवरुन राजकारणही सुरु आहे. विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रामगिरीं महाराजांना भेटायला वेळ आहे. पण पीडित मुलीच्या घरी जायला त्यांना वेळ नाही अशी टीका सुषमा अंधारे यांनी केले. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार आहेत, असही त्या म्हणाल्या.

मंगल प्रभात लोढा यांनी केलेली घोषणा

 मुंबईतील प्रत्येक शिक्षण संस्थेत महिला स्वच्छतागृहाजवळ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक शाळेत आत्मरक्षाशी निगडीत अभियानाची सुरुवात केली जाणार आहे, शाळेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पोलीस वेरिफिकेशन करण्याचे आदेश.कर्मचाऱ्यांमध्ये बस चालक, वाहक, सुरक्षा कर्मचारी, कॅन्टीनमधील कर्मचारी या सगळ्यांचा समावेश.शाळेत महिला पालकांची आणि शाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करणार. प्रत्येक महिन्याला मुलींच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा घेतला जाणार आढावा.

Latest Posts

Don't Miss