Saturday, January 11, 2025

Latest Posts

Nepal Bhukamp: नेपाळच्या भूकंपाचे दिल्लीलाही धक्के

Nepal Bhukamp 2023: भारताच्या शेजारी असलेल्या नेपाळमध्ये शुक्रवारी भूकंप आला. या भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल होती. (Nepal Earthquake Shock Waves Travels Till Delhi) या भूकंपात जवळपास ७० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. याच भूकंपाचे धक्के दिल्लीलाही बसले आहेत.

राष्ट्रीय भूकंप मापण केंद्राने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्र बिंदू नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा येथे आहे.स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या महिती प्रमाणे या भूकंपात जाजरकोट्यात ३४ तर शेजारी असलेल्या रुकुमच्या पश्चिम जिल्ह्यात ३६ लोकांचा बळी गेला आहे. रात्री उशीरा भूकंप आल्याने अनेकांना मदतकार्य मिळाली नाही.मात्र आता या दुर्घटनेनंतर तिन्ही सुरक्षा यंत्रणा मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहचले असल्याची माहिती नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आली आहे.भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान देखील झाले आहे. नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयाकडून या घटनेकडे बारकाईने लक्ष दिल्या जात आहे.जखमींवर उपचार सुरु असून मदत कार्यास वेग आलेला आहे. नेपाळच्या गृहमंत्रालयाने सांगितलं की, दैलेख, सल्याण आणि रोल्पा जिल्ह्यांसह इतरही काही जिल्ह्यांतून लोक जखमी झाल्याची आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या भूकंपाचे धक्के दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागात जाणवले आहेत.मात्र यात कोणतीही जीवीत हानी झालेली नसली तरी दिल्लीचे सरकार अलर्ट मोडवर आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटने बद्दल दुःख व्यक्त केले असून भारत नेपाळच्या पाठिशी आसल्याचे म्हणटंले आहे.आपल्या संवेदना व्यक्त करताना मोदी यांनी शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. नेपाळमध्ये या पहिले गेल्या महिन्यात ३ आॅक्टोबर रोजी भूकंपाचे धक्के बसले होते. तेव्हाचा भूकंप ६.२ रिश्टर स्केल होता.यात देखील काही प्रमाणात नुकसान झाले होते.

Latest Posts

Don't Miss