Saturday, January 11, 2025

Latest Posts

मध्यरात्री राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने घेतली जरांगेंची भेट ; काय झाली चर्चा

| TOR News Network |

Manoj Jarange Patil Latest News : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्याची माहिती आहे.(Ncp top leader meet jarange patil) बुधवारी मध्यरात्री तो बडा नेता आंतरवली सराटीत पोहोचले. स्टेजवर मनोर जरांगे यांच्यापाशी जाऊन बसले. दोघांमध्येही  काही वेळ चर्चाही झाली. पण नेमकी काय चर्चा  झाली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर  आलेली नाही. त्यानंतर त्यांनी मनोज जरांगे यांच्यासहकाऱ्यांशीही चर्चा केली. त्यानंतर काही वेळाने ते निघूनही गेले. पण त्यांच्याया  भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आले आहे.

मंगळवारी रात्री 12 च्या सुमारास राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांच्या तब्येतीची त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी केली होती.(Mla rajesh tope meet jarange patil) त्यांनी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली.(rajesh tope request jarange patil to take treatment) राजेश टोपे गेल्यानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती फारच खालावत असल्याने आंदोलकांनी सहकाऱ्यांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मध्यरात्री वैद्यकीय उपचार घेतल्याचे समजते.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या काही झाल्यास त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल, असा इशारा माजी  मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. (prithviraj chavan on jarange patil) त्याचबरोबर मनोज जरांगे यांचे उपोषण आणखी काही काळ सुरू राहिल्यास मराठा आंदोलक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहेत. त्यातच राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास 20  दिवस आहेत. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या दृष्टीने हे दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

Latest Posts

Don't Miss