Thursday, January 16, 2025

Latest Posts

अजित पवारांचे घड्याळ बंद पडणार ? शरद पवार उच्च न्यायालयात

| TOR News Network |

Sharad Pawar Latest News : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटा कडे गेले. तो निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता. मात्र हे प्रकरणत न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणाचा निकाल अजून लागलेला नाही. त्यामुळे अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. (NCP Sharad Pawar Group Aggressive for Party Symbol) आमच्या प्रमाणेत त्यांना देखील दुसरे चिन्ह द्या अशी मागणी करण्यात आली आहे. (Give new party symbol to ajit pawar ncp)
शरद पवार यांच्या पक्षाकडून शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. (Sharad Pawar Ncp Petition ) ही याचिका तातडीने सुनावणी होण्यासाठी सूचिबद्ध करण्यात यावी, अशी मागणीही केली आहे. त्यानुसार, ही याचिका 25 सप्टेंबरला सुनावणीसाठी सूचिबद्ध करण्यात आली आहे. (Hearing on 25 sept on ncp symbol) 25 सप्टेंबर रोजी प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. तसंच, कोर्ट नक्की सुनावणी कधी घेणार हे आज येणाऱ्या कोर्टाच्या लिस्टमधून स्पष्ट होणार आहे. यापूर्वी देखील २ वेळा शरद पवार यांच्या पक्षाकडून हे प्रकरण मेंशन करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र कोर्टाने त्यावर सुनावणी घेतली नव्हती.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता देण्याचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांना नवीन निवडणूक चिन्हे देण्यात यावीत, अशी मागणी शरद पवार पक्षाकडून करण्यात आली आहे. वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

लोकसभेपूर्वी निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी हे चिन्ह दिलं होतं.(tutari symbol for sharad pawar ncp party) तसंच, पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वापरण्यास परवानगी दिली होती. तर, अजित पवार यांच्या पक्षाला घड्याळ हे चिन्ह देण्यात आले होते. तसंच, अजित पवार यांच्या पक्षाने शरद पवार यांचे नाव आणि छायचित्र वापरू नये, असा आदेशदेखील दिला होता.

लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाला अपक्षांचा मोठा फटका बसला होता. शरद पवार गटाला निवडणुकीत तुतारी हे चिन्ह मिळाले होते. त्यावर पक्षाने निवडणूक लढवली होती. तर काही अपक्षांना तुतारी सदृश्य ट्रंपेट हे चिन्ह मिळाले होते. त्यांनी त्यावर निवडणूक लढवली होती. या चिन्हामुळे मतदार संभ्रमीत झाला आणि शरद पवार गटाची मतं अपक्षांनी मिळाली. त्यामुळे लोकसभेतील आमच्या गटाचा उमेदवार थोड्या फरकाने पडल्याचा दावा शरद पवार गटाने यापूर्वी केला होता.

Latest Posts

Don't Miss