Saturday, January 11, 2025

Latest Posts

खासदार सुप्रिया सुळेंची निलंबनानंतर पहिली प्रतिक्रिया

प्रश्न विचारणे भाजपाच्या राज्यामध्ये गुन्हा आहे का ?

Supriya sule On Mp Suspension: लोकसभेतल्या सुरक्षेच्या प्रश्नावरुन खासदारांनी चर्चेची मागणी केली. त्यानंतर काल लोकसभा आणि राज्यसभेतल्या खासदारांचं निलंबन करण्यात आलं. त्यापाठोपाठ आजही निलंबन करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत संसदेतले १४१ खासदार निलंबित झाले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या  खासदार सुप्रिया सुळेही आहेत. सुप्रिया सुळे यांनी निलंबनानंतर ही अघोषित आणीबाणी आहे असं म्हणत पोस्ट लिहिली आहे.(Ncp Mp Supriya Sule Post After Suspension From Loksabha) काय आहे सुप्रिया सुळेंची पोस्ट?

दुष्काळ आणि सरकारच्या धोरणांमुळे पिचलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, कांदा-कापूस-सोयाबीन-दूधाच्या दरांचा प्रश्न सरकारला विचारायचा नाही तर कुणाला विचारायचा? शेतकऱ्यांचं म्हणणं जर सरकारपर्यंत मांडायचंच नसेल, बेरोजगारांची घुसमट सरकारला ऐकायचीच नसेल, महिला-मध्यमवर्गीयांचे प्रश्न या सरकारला ऐकायचेच नसतील तर ते मांडायचेच नाहीत का ? आणि जर हे प्रश्न मांडले तर ते सभागृहातून बाहेर काढतात.संसदेच्या सुरक्षेत नेमकी काय चूक झाली याबद्दल प्रश्न विचारणे भाजपाच्या राज्यामध्ये गुन्हा आहे का ? हा प्रश्न विचारणाऱ्या १४१ खासदारांना माननीय लोकसभा अध्यक्षांनी निलंबित केले आहे. भाजपा सरकारने आज माझ्यासह आणखी ४९ खासदारांना संसदेतून निलंबित केले. सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहे हे स्पष्ट आहे. तसेच काही महत्वाच्या विधेयकांना चर्चेविनाच मंजूर करण्याचा भाजपाचा डाव आहे. ही अघोषित आणीबाणी आहे. जनतेचा आवाज दडपाण्याचे पाप हे सरकार करतंय आणि म्हणूनच आम्ही सर्वजण या दडपशाहीच्या विरोधात ठामपणे एकजूटीने उभे आहोत.तसंच ही अघोषित आणीबाणी आहे असंही म्हटलं आहे.

Latest Posts

Don't Miss