Saturday, January 18, 2025

Latest Posts

चर्चेला उधाण : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार 

Theonlinereporter.com – May 8, 2024 

Sharad Pawar Latest News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखती मध्ये मोठा दावा केला आहे. यावेळी बोलताना शरद पवार म्हणालेत की येत्या काळात इतर प्रादेशिक पक्ष आता काँग्रेस पक्षात विलीन होतील. (Regional Party will merge in congress) त्यामुळा आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? या चर्चा आता सुरु झाल्या आहेत.(Ncp will merge with congress)

यावेळी बोलताना शरद पवार म्हणालेत काँग्रेस आणि आमच्या पक्षात फरक नाही. (No difference between Congress And NCP) वैचारिकदृष्ट्या आम्हीसुद्धा गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात.(Sharad Pawar On regional Party) त्याचवेळी उद्धव ठाकरे आपल्याच विचारधारेचे आहेत. ते समविचार आहे, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. 

देशाच्या राजकारणातील जेष्ठ नेते शरद पवार नेहमी चर्चेत असतात. अनेक वर्षे काँग्रेस पक्षात घालवल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. परंतु त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत. शरद पवार यांनी आता एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. त्यात धक्कादायक दावे केले आहेत.(Shocking claim by sharad pawar) 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याबाबतही मोठी विधाने त्यांनी केली आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.(Sharad Pawar on Ncp merge)

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या जुन्या मुलाखती मध्ये शरद पवार यांनी या सर्व प्रकारावर नकार दिला होता. परंतु आता शरद पवार यांच्या मुलाखतीमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शरद पवार यांनी मुलाखतीत सांगितले की, पुढील काही वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी जवळीक साधतील किंवा त्यांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय असेल. (Sharad Pawar claim on ncp to merge) शरद पवार यांना हा पर्याय राष्ट्रवादीसाठी आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते स्पष्टच म्हणाले, काँग्रेस पक्ष आणि आमच्यात काही फरक मला दिसत नाही. या दोन्ही पक्षांची विचारसरणी गांधी आणि नेहरू यांच्या विचाराची आहे. परंतु यावर मी सहकाऱ्यांच्या सल्ला घेतल्याशिवाय आता काही बोलत नाही.  परंतु वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. परंतु नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणे कठीण आहे.

Latest Posts

Don't Miss