Monday, November 18, 2024

Latest Posts

तुमच्यासारखे ५६ आले आणि गेले, पण मी घाबरत नाही

खासदार नवनीत राणा यांचं ओपन चॅलेंजच

| TOR News Network | Navneet Rana Vs Imtiaz Jaleel : खासदार इम्तियाज जलील यांनी थेट नवीन राणा यांवर प्रहाक करत एक वक्तव्य केले. त्याचा समाचार घेत खासदार नवीन राणा यांनी इम्तियाज जलील यांना प्रत्युत्तर देत ओपन चॅलेंजच दिले आहे. तुमच्यासारखे ५६ आले आणि गेले, पण मी घाबरत नाही, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.(Navneet Rana Open Challenge)

खासदार नवनीत राणा म्हणाल्या हिंमत असेल तर, माझ्याविरोधात अमरावतीतून निवडणूक लढवावी आणि माझा पराभव करून दाखवावा, असं ओपन चॅलेंज नवनीत राणा यांनी जलील यांना दिलं. (Navneet Rana gave an open challenge to Jalil)  त्या अमरावतीमधील एका कार्यक्रमात बोलत होत्या. ‘या देशात राहायच असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल’, असा पुनरुर्चार देखील राणा यांनी केला.

हिंमत असेल तर अमरावतीत येऊन दाखवा

या देशातील लोकांनी अनेक पिढ्यानपिढ्या राम मंदिर उभारण्याची वाट पाहिली. तुमच्यासारखे अनेकजण येऊन गेले. पण अयोध्येत राम मंदिर उभारून दाखवलं, अशी टीकाही नवनीत राणा यांनी खासदार जलील यांच्यावर केली.ओवेसी यांच्याबद्दल एक शब्द देखील बोलल्यास ते व्याजासह अमरावतीमध्ये आणि तुझ्या घरी येऊन परतफेड करेल, अशा इशारा ओवेसी यांनी दिला होता. या इशाऱ्याचा देखील राणा यांनी खरपूस समाचार घेतला आहे. हिंमत असेल तर अमरावतीत येऊन दाखवा मी साडीचा पदर खोचून उभी आहे, असंही नवनीत राणा म्हणाल्या.(If you have courage, come to Amravati and show it)

कसे निवडून येता हे मी पाहतेच

तुमच्यात जर हिंमत असेल, तर अमरावतीत येऊन माझ्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवा आणि मला पाडून दाखवा. (If you have guts, come to Amravati and contest the Lok Sabha elections) जर नाही लढवल्यास तुम्ही छत्रपती संभाजीनगरमधून कसे निवडून येता हे मी पाहतेच, असं ओपन चॅलेंज देखील नवनीत राणा यांनी इम्तियाज जलील यांना दिला.

Latest Posts

Don't Miss