| TOR News Network | Sanjay Raut on Pm Modi : नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री होते आता नाही. (Modi is not pm now) निवडणुकीची घोषणा झाल्यावर राज्यात किंवा देशात किंवा राज्याचे मुख्यमंत्री हे फार तर कार्यवाहक मुख्यमंत्री असतात आणि देशाचे प्रधानमंत्री हे कार्यवाहक प्रधानमंत्री असतात. (Modi Is Now Acting Prime Minister) त्यामुळे सरकारी यंत्रणाचा वापर करून प्रचाराला जाता येत नाही. आणि जर ते सरकारी विमान आणि फौज फाटा घेऊन गेले, तर निवडणूक आयोगाने त्या संदर्भातला खर्चाचे बिल त्यांना पाठवायलं हवं आणि त्या पक्षाच्या खात्यातून ते पैसे वसून करायला हवेत, असे शिवसेना उबाठा गटाचे नेत आणि खासदार राऊत म्हणाले.(MP Sanjay Raut on PM Modi’s tour in Mumbai)
RBI चा 90 वा वर्धापन दिन साजरा होत असून त्याच कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान आज मुंबईत आले आहेत.(Pm Modi In Mumbai Today) पंतप्रधानांच्या याच दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. पंतप्रधान आज मुंबईला आले आहेत, पण ते का येत आहेत ? जमिनी शोधायला येत आहेत का, की अडाणीला कोणती जमीन द्यायची आहे. कोणती जमीन शिल्लक आहे का वरून पाहणार आहेत का ? असा बोचरा सवाल विचारत राऊत यांनी टीकास्त्र सोडले.( Sanjay Raut Criticised PM Modi) गेल्या काही वर्षात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी मुंबई विकली. (Amit Shah and Narendra Modi sold Mumbai) गौतम अडाणी, या त्यांच्या उद्योगपती मित्राला धारावी विकले. मुंबईचे भूखंड विकले, मुंबईचे उद्योग पळवले.आता मोदी दहा सभा घेऊन काय करणार ? आता त्यांना काय विकायचे आहे ? असा खोचक सवालही राऊत यांनी विचारला.मोदींनी मुंबईत दहा नाही 100 सभा घ्याव्यात, पण मुंबईतून भाजप हा पूर्णपणे तडीपार होणार. (BJP will be completely defeated from Mumbai)
त्यांचा एक एक दौरा हा 25 -25 कोटीचा
नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसापासून, निवडणुका जाहीर झाल्यापासून सरकारी यंत्रणा सरकारी विमानात सरकारी हेलिकॉप्टर घेऊन फिरत आहेत, घोषणा करत आहेत. त्यांचा एक एक दौरा हा 25 -25 कोटीचा असतो. (Each of their tours is worth 25-25 crores) आचारसंहिता ही केवळ विरोधी पक्षासाठी आहे का ? काँग्रेस साठी शिवसेनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस साठी आहे .नोटीसा फक्त आम्हालाच देणार का ? असा सवाल राऊत यांनी विचारला.प्रधानमंत्री ज्या पद्धतीने सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत आहेत आणि सरकारी यंत्रणा घेऊन प्रचाराला उतरले आहेत, हा भ्रष्टाचार नाही का? मोदी हे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत. त्यांना अशा प्रकारे कोणत्याही घोषणा करण्याचा अधिकार नाही. सरकारी यंत्रणा वापरण्याचा अधिकार नाही. हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, अस आरोपही राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर केला.
आशिष शेलारांवरही टीकास्त्र
ठाकरेंचा पेट्रोलचा खर्च मी करतो त्यांनी मालवणी भागात जावं, असं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. शेलार यांना काल माननीय उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिल आहे.आम्ही त्यांच्यासाठी स्पेशल विमानाची व्यवस्था करतो,त्यांनी मणिपूरला जावं. (Pm Should go to manipur) तिकडे महिलांवर अत्याचार झाले आहेत ते पाहावे. कश्मीरी पंडितांचे हालहवाल समजून घेण्यासाठी त्यांना आम्ही जम्मू-काश्मीरला पाठवायला तयार आहोत .आमच्या खर्चाने त्यांनी जाऊन यावं, उगाच बकवास करू नये आणि तोंडाची वाफ घालवू नये अशी टीका संजय राऊत यांनी केली. (Sanjay raut on Narendra modi)
मविआच्या जागावाटपावर आता चर्चा नाही
महाराष्ट्रात जागावाटपावरची चर्चा बंद झाली पाहिजे. महाराष्ट्रात ही चर्चा आता बंद झाली आहे.(MVA seat allocation discussion closed) चर्चा करायचीच असेल तर आगामी विधानसभा किंवा मग 2029 सालच्या लोकसभा निवडणुकीची आम्ही चर्चा करू, असं संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं.