द ऑनलाइन रिपोर्टरशी केली विशॆष बातचीत
Nana Patole Statement On Congress Foundation Day 2023: काँग्रेस पक्षाचा १३८ वा वर्धापन दिन नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. २८ डिसेंबर हा काँग्रेस पक्षाचा स्थापना दिन. यानिमित्ताने काँग्रेसने नागपूरमध्ये ‘है तैयार हम’ या महारॅलीचे आयोजन केले असून याद्वारे काँग्रेस लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. (Congress celebrating 138 th Foundation Day in Nagpur Maharashtra) यात 75 वर्षात काँग्रेसने काय केले आणि काँग्रेसची देशाला गरज का हाच सभेचा प्रमुख अजेंडा असणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी द ऑनलाइन रिपोर्टरशी बोलताना दिली.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह विविध राज्यांतील काँग्रेसचे मुख्यमंत्री या रॅलीला उपस्थित राहणार आहे. बाहदुरा भागात सभा होणार असून यासाठी देशभरातून काँग्रेसचे लाखो कार्यकर्ते नागपूरकडे रवाना झाले आहेत. स्वातंत्र्य चळवळीत डिसेंबर १९२० मध्ये नागपूरच्या भूमितूनच महात्मा गांधी यांनी जुलमी, अत्याचारी ब्रिटिश सत्तेविरोधात असहकार आंदोलनाचा नारा दिला होता. शेवटी १९४७ मध्ये ब्रिटिशांना भारत देश सोडून पळून जावे लागले, हा इतिहास आहे. नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण आहे. नागपूरमधूनच १९५९ मध्ये इंदिरा गांधी यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याची घोषणा केली गेली होती. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या नागपूर शहरात काँग्रेसचा १३८ वा स्थापना दिवस साजरा होत आहे अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. स्थापना दिवस काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी महत्वाची व आनंदाची बाब आहे. ज्या मैदानात हा मेळावा होत आहे, त्याला ‘भारत जोडो मैदान’ असे नाव दिले असून ‘है तैयार हम’ (Hain Taiyaar Hum Congress Rally) अशी या महारॅलीची संकल्पना आहे. या मेळाव्याची सर्व तयारी झाली आहे. आज देशात लोकशाही व संविधान संपवण्याचे काम केले जात आहे, भाजपच्या सरकारने अत्याचारी व्यवस्था निर्माण केली आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. भाजपा सरकारने निर्माण केलेल्या या अत्याचारी व्यवस्थेला संपवण्यासाठी, भ्रष्टाचारमुक्त भारत, अत्याचारमुक्त भारत निर्माण करण्याबरोबरच रोजगार निर्मिती करणे, महागाई कमी करणे, शेतकरी, कामगार यांना न्याय देणे, लोकशाही व संविधान वाचवणे, हे काँग्रेस पक्षाचे दायित्व आहे आणि त्यासाठीच ‘है तैयार हम’ अशी संकल्पना मांडलेली आहे.
साम्य असणारी बातमी : Nana Patole Statement In Winter Assembly
कार्यकर्त्यांमध्ये नव उत्साह संचारणार
देशाच्या निर्मितीपासून तर आज पर्यंत काँग्रेसची वाटचाल,काँग्रेसने देशासाठी दिलेले बलिदान, काँग्रेस पक्षाची देशाला गरज का असे अनेक मुद्द्यांवर माहिती दिली जाणार आहे.स्थापना दिवसामुळे कार्यकर्त्यांमध्ये नव उत्साह संचारणार आहे.
– नाना पटोले ,प्रदेशाध्यक्ष काँग्रेस