Thursday, January 16, 2025

Latest Posts

भाजपाची गॅरेंटी ही जुमलेबाज गॅरेंटी

| TOR News Network | Nana Patole on Bjp Guarantee : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यातून सुरू होत आहे. या यात्रेचा आढावा व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे धुळे शहरात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर टीका केली.यावेळी त्यांनी मोदीच्या गॅरेंटी शब्दावर बोलताना तो शब्द आमचा चोरला असल्याचे म्हणत भाजपवर टीका केली. (BJP Stolen our word Guarantee)

यावेळी नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की भाजपने काँग्रेसचा गॅरेंटी हा शब्द चोरला असून कर्नाटकात झालेल्या निवडणुकीच्या राहुल गांधींनी प्रत्येक भाषणात तेथील मतदारांना दिलेल्या पाच गॅरेंटी पूर्ण करण्यात आली. आमच्या गॅरंटी दिलेल्या शब्द पूर्ण केला जातो. मात्र भाजपाची गॅरेंटी ही जुमलेबाज गॅरेंटी आहे. (Bjp is jumlebaz Says Nana Patole ) भाजपाकडून गॅरेंटी या शब्दाचा देखील अपमान केला जात आहे.

ते दुसऱ्यांचे लोक चोरतात

भाजपा अत्यंत कमजोर पक्ष असून आमचे लोक त्यांना आयात करावे लागत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत नांदेडमधून काँग्रेस भरघोस मतांनी विजयी होईल, आमच्याकडे सक्षम उमेदवार देखील असून भाजपा हा कमजोर पक्ष असून ते दुसऱ्यांचे लोक चोरतात अशी घणाघाती टीका देखील नाना पटोले यांनी यावेळी केली. भाजपाने आदर्श चोरून नेला, आदर्श वर डाका टाकला, आदर्शला शिव्या घातल्यात लोकसभेच्या निवडणुकीत आणि दुसऱ्या दिवशी त्यांना राज्यसभेवर देखील पाठवले. या देशात प्रत्येक भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन सत्ता चालवण्याचे काम भाजपकडून सुरू आहे, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली.

Latest Posts

Don't Miss