Saturday, January 11, 2025

Latest Posts

मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे संघ-भाजपची स्क्रिप्ट

Nana Patole on Cm Shinde in Winter Assembly : राज्यात सध्या ऐरणीवर असलेल्या विविध समाजाच्या आरक्षणावर जातनिहाय जनगणना हाय पर्याय आहे. काँग्रेस पक्षाने त्यासंदर्भातील आपली भूमिका विधिमंडळ सभागृहात मांडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे. संघ व भारतीय जनता पक्षाला आरक्षणच संपवायचे आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात वाद चिघवळला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आरक्षणप्रश्नी केलेले भाषण हे भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेली ‘स्क्रिप्ट’ होती, (Nana patole says Cm shindes speech = Rss Bjp Script)असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला.

नागपूर येथील विधानभवन परिसरात बुधवारी (ता. 20) प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्यासाठी जातनिहाय जनगणना हाच पर्याय आहे. शिंदे समितीचे काम फक्त कुणबी प्रणाणपत्र देणे हेच आहे का, हे पाहावे लागणार आहे. प्रमाणपत्र देणे हे कायमस्वरुपी काम नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात म्हणाले की, अनेक जाती आरक्षण मागत आहेत. त्यासाठी आंदोलने सुरू आहेत. त्या समाज घटकांना आरक्षण द्यायचे आहे. पण या सर्वांवरचा एकच पर्याय आहे, तो म्हणजे जातनिहाय जनगणना, असे पटोले यांनी सांगितले. केंद्रातील भाजपा सरकारने ही जनगणना करावी, म्हणजे सर्वांना समान न्याय मिळेल. महाराष्ट्रात विविध सामाजात लावलेली आगही थांबेल.

दोन्ही ठिकाणी ‘टाइमपास’अधिवेशन

मुंबईतील मोठा हिरे व्यापार सूरतला नेला आहे. आता आणखी काही उद्योग गुजरातला पळवून नेता येतील का, यासाठी केंद्रातील गुजरात लॉबीचा प्रयत्न असेल, असा टोला पटोले यांनी लगावला. सरकारने अत्यंत कमी दिवसांचे अधिवशेन घेत राज्यातील विशेषत: विदर्भातील जनतेवर अन्याय केला आहे. केंद्र सरकारलाही संसदेचे हिवाळी अधिवेशन घेण्याची इच्छा नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य काय दोन्ही ठिकाणचे अधिवेशन ‘टाइमपास’ पद्धतीने सुरू असल्याची टीकाही पटोले यांनी केली.

 

Latest Posts

Don't Miss