Sunday, January 12, 2025

Latest Posts

सरकारला जनतेचे कोणतेच प्रश्न सोडविता आले नाहीत

विरोधकांची विधान भवन परिसरात घोषणाबाजी

Nagpur Winter Assembly Latest News : हिवाळी अधिवेशनाच्या काळात एकाही घटकाचा प्रश्न सुटला नसल्याची टीका करीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारचा निषेध केला. बुधवारी सकाळी हाताला काळ्या पट्ट्या बांधून यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. (opposition leaders says Maha Govt Fails to Fullfill Common mans Question in this Winter Assembly)

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनिल देशमुख, बाळासाहेब थोरात, रोहित पवार, वैभव नाईक, राजन साळवी, रवींद्र धनगेकर यांच्यासह इतर आमदार या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते. हिवाळी अधिवेशनाच्या काळात जनतेचे कोणतेच प्रश्न राज्य सरकारला सोडविता आले नाहीत.  शेतकऱ्यांना मदत मिळाली का, पेपरफुटीवर कडक कायदा झाला का, परीक्षा फी कमी झाली का, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सुटले का, आशा सेविकांचे प्रश्न सुटले का,  कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना न्याय दिला का, कर्मचारी भरती सुरू झाली या सगळ्या प्रश्नांचे उत्तर ‘नाही’ असेच असल्याची टीका या विरोधी पक्षाच्या आमदारांनी केली. ‘प्रश्न कोणताही विचारा, या सरकारचा नंदीबैल म्हणतो नाही, नाही’, ‘ खासदार निलंबनाचा निषेध असो’, ‘ राज्य सरकारचा धिक्कार असो’, अशा वेगवेगळ्या घोषणा देऊन विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्य सरकारचा निषेध केला.

मोदी सरकार विरोधकांचा आवाज दाबतोय – पटोले

नागपूर, वेलमध्येही न उतरता जागेवर उभे राहून प्रश्न विचारणाऱ्या 141 खासदारांना निलंबित करीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे, असा आरोप करीत कॉँग्रसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद् सरकारवर टीकेची झोड उठविली. विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले,  एकतर्फी निर्णय घेऊन केंद्र सरकार विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करीत आहे. अशा रितीने देशाच्या इतिहासात प्रश्न विचारणाऱ्या खासदारांना कधीही निलंबित करण्यात आलेले नाही. ही लोकशाहीची नुसती थट्टा नसून तिचा खून केल्यासारखे आहे. महाराष्ट्रच नव्हे तर देशातील अनेक विधानसभांमध्ये याचे पडसाद उमटले आहेत. राज्यातही याहून वेगळे चित्र नाही. विरोधकांचा आवाज दाबण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केंद्र आणि भाजापा सरकार करीत आहे.

पशूंची गणना केली जाते, मग जनगणना का नाही-  बच्चू कडू

राज्यासह देशात पशूंची गणना केली जाते, मग जातिगत जनगणना का नाही, असा सवाल प्रहार पक्षाचे प्रमुख आणि सत्ताधारी पक्षातील आमदार बच्चू कडू यांनी विधानभवन परिसरात प्रसिद्धिमध्यमांशी बोलतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला केला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मंगळवारी जातिगत जनगणनेला विरोध केला होता. त्यावर विरोधकांनीही संघ आणि भाजपवर चांगलीच टीका केली होती. आता बच्चू कडू यांनी त्यावर भाष्य करतांना म्हटले की, जातिगत जनगणना व्हायलाच पाहिजे. त्याला आमचे (प्रहार पक्षाचे) समर्थन असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले आहे. त्याने कोणत्या समाजाचा लोकसंख्येत किती वाटा आहे, हे स्पष्ट होईल. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जारांगे पाटील यांनी आता पुन्हा आंदोलन केल्यास मी कार्यकर्ता म्हणून त्यात सहभागी होईल. शेवटी मराठा समाजाला आरक्षण मिळून न्याय मिळायलाच हवा. विदर्भाच्या प्रश्नावर केवळ एक तास चर्चा होणे योग्य नाही. त्याने विदर्भाला न्याय मिळू शकत नसल्याचेही कडू म्हणाले.

Latest Posts

Don't Miss