Saturday, January 11, 2025

Latest Posts

नागपूर विद्यापीठाच्या योगासन संघाचे अभूतपूर्व यश

खेलो इंडिया विद्यापीठ गेम्स : सलग तिसऱ्यांदा मिळविले पदक

| TOR News Network | Nagpur University Sports News : आसाम, गुवाहाटी येथे सुरू असलेल्या चवथ्या खेलो इंडिया विद्यापीठ गेम्स (Khelo India University Games) मध्ये योगासन स्पर्धेत पुरुष गटात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संघाने धडाकेबाज कामगिरी करीत सुवर्ण पदक प्राप्त केले. (Yogasana competition Khelo India University Games) सलग तिसऱ्यांदा पदक प्राप्त करण्याची कामगिरी नागपूर संघाने केली आहे. (Nagpur University team won the gold medal third time in a row)

स्पर्धेत नागपूर विद्यापीठाच्या पुरुष संघाने ४२२.०८ गुणांसह प्रथम क्रमांक मिळवित सुवर्ण पदक आपल्या नावे केले. दुसरे स्थान ४२०.४१ गुणांसह पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी ने प्राप्त केले. तर तिसरे स्थान ४१६.२५ गुणांसह हरिद्वारच्या कवी संस्कृती विद्यापीठाने प्राप्त केले.

किड्स भुवनेश्वर येथे झालेल्या दुसऱ्या खेलो इंडिया स्पर्धेत विद्यापीठाच्या पुरुष संघाचे सुवर्ण पदक थोडक्यात हुकले होते. त्यामुळे त्यांना रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले होते. त्यानंतर या संघाने आपल्या कामगिरीत सुधारणा केली. मागील वर्षी जैन युनिव्हर्सिटी बंगलोर येथे झालेल्या तिसऱ्या खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदकाची कामगिरी केली होती, आणि यंदा लागोपाठ दुसऱ्या वर्षीही सुवर्णपदक मिळवून नागपूर विद्यापीठाच्या खेळाडूंनी सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

डॉ. तेजसिंह जगदाळे यांच्या मार्गदर्शनात नागपूर विद्यापीठाच्या पुरुष संघाने हे यश प्राप्त केले. योगासन संघात- वैभव श्रीरामे, प्रणय कंगाले, वंश खिंची (एसबी सिटी कॉलेज), हर्षल चुटे (प्रियदर्शनी अभियांत्रिकी कॉलेज), वैभव देशमुख(कमला नेहरु कॉलेज), ओम राखडे(धनवटे नॅशनल कॉलेज) यांचा समावेश होता.

डाॅ. सोनाली सूर्यवंशी (Dr. Sonal Suryavanshi) यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने या योगासन संघाची निवड केली. निवड समितीत डॉ. देवेंद्र वानखेडे, डॉ. कुमकुम बोरटकर, डॉ. तेजसिंह जगदाळे आणि निमंत्रित सदस्य म्हणून अनिल मोहगांवकर यांचा समावेश होता. नागपूर विद्यापीठाच्या योगासन पुरुष संघाने केलेल्या कामगिरीबद्दल विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद सुर्यवंशी (Nagpur University Sports Department Director Dr. Sharad Suryavanshi) यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, (Dr. Subhash Choudhary) प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, (Dr. Sanjay Dudhe) कुलसचिव डॉ. राजू हिवसे (Dr. Raju Hivse) आदींनी पदक प्राप्त खेळाडूंचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

सुवर्ण पदक मिळवून देईल अशी अपेक्षा होतीच

 मागील वर्षी प्रमाणे यंदाही नागपूर विद्यापीठाचा योगासन संघ दमदार कामगिरी करीत सुवर्ण पदक मिळवून देईल अशी अपेक्षा होतीच, (Performance as expected) या संघाने देखील अपेक्षाभंग न करता आपल्या क्षमतेला साजेशी कामगिरी करीत नागपूर विद्यापीठाच्या संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले. नागपूर विद्यापीठातर्फे या विजयी खेळाडूंना प्रति विद्यार्थी चौदा हजार याप्रमाणे ८४ हजाराची रोख रक्कम प्राप्त होणार आहे.

-डॉ. शरद सुर्यवंशी
संचालक,नागपूर विद्यापीठ क्रीडा विभाग

Latest Posts

Don't Miss