Nit College Pratibimb 2024 विद्यार्थांनी कोणत्या कठीण परीस्थितीत हताश होऊ नये. नेहमी संघर्ष करायची तयारी ठेवावी. संघर्षातूनच जीवनात यश मिळते असे प्रतिपादन तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नागपूर विभागीय कार्यालयाचे सहसंचालक डॉ. मनोज डायगव्हाने यांनी केले. (Dr.Manoj Daigavane in NIT College ) ते एनआयटी महाविद्यालयाच्या वार्षीक मेळावा प्रतिबिंब २०२४ या स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
प्रतिबिंब २०२४ हे बौध्दिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची एक जुगलबंधी आहे. जिथे विद्यार्थी आपल्या कलागुणांचे व सुप्त गुणांचे सादरीकरण करतात. आज दि.८ फेब्रुवारीला प्रतिबिंबचे उद्घाटन डॉ. मनोज डायगव्हाने यांच्या हस्ते झाले. (Pratibimb 2024 Gathering inugrate News)यावेळी मंचावर महाविद्यालयाचे सी.ई.ओ.डॉ. राजेश वायगांवकर, एनआयटी तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. गजानन पोटभरे, उपप्राचार्य प्रा. नागेश इजमुळवार होते. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. समीश फाले व प्रा. शारदा चौधरी प्रामुख्याने उपस्थीत होते. यावेळी डॉ. स्मीता चौधरी व डॉ.समीश फाले यांच्या डॉक्टरेट यशाबद्दल पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर प्रा. स्वाती इंगळे यांनी चालु असलेल्या प्रतिबिंब २०२४ ची संपूर्ण रुपरेषा मांडली.(Pratibimb 2024 Gathering News) त्यानंतर एनआयटी तंत्रनिकेतनचे प्राचार्यांनी वार्षीक अहवाळ सादर करुन सत्रात घेतलेल्या सर्व कार्यक्रमाचा उलगडा केला व विद्यार्थ्यांना स्वत:चा सर्वांगीन विकास व रोजगारक्षम अभियंते बनण्याचा सल्ला दिला.प्रमुख पाहुणे डॉ. मनोज डायगव्हाने यांनी त्यांच्या प्रमुख भाषणात प्रतिबिंबचा अर्थ स्पष्ट केला.सार्वजनिक कार्यक्षेत्रात संस्थेची प्रतिमा निर्मीती व त्याचा ढाचा कीती उपयुक्त ठरु शकते या बद्दल माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यांना सकारत्मकतेने विचार करावा व कठीण परीस्थितीतुन हताश न होता संघर्ष करा.जीवनात यश नक्की मिळेल असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येन उपस्थित होते