Nagpur Metro Phase 2 Latest News: आज दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ पासून नागपूर मेट्रो रेल फ़ेज – २ च्या निर्माण कार्याला रितसर सुरुवात झाली आहे मिहान येथे ईको पार्क आणि कामठी महामार्ग येथे ऑल इंडिया रेडियो येथे आयोजित कार्यक्रमात महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हार्डीकर प्रामुख्याने उपस्थित होते तसेच संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग)श्री.अनिल कोकाटे, संचालक(प्रकल्प),संचालक(वित्त) श्री. हरेंद्र पांडे, संचालक(प्रकल्प) श्री. राजीव त्यागी, कार्यकारी संचालक श्री. राजेश पाटील,नरेश गुरबानी,अरुण कुमार,नवीन कुमार सिन्हा,जय प्रकाश डेहारिया,आरव्हीएनएलचे कार्यकारी संचालक श्री. एम. पी. सिंग देखील उपस्थित होते. उल्लेखनीय आहे कि, महा मेट्रोने या पूर्वीच फ़ेज – २ संदर्भात विविध कार्याकरिता निविदा प्रसारित केल्या होत्या ज्यामध्ये रेल विकास निगम लिमिटेड या कंपनीला कंत्राट प्रदान करण्यात आले आहे.
रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला रिच – २ येथील ६.९२ किमी लांबीचा (आटोमोटिव्ह चौक ते लेखा नगर पर्यंतचा) एलिव्हेटेड व्हायाडव्ट ज्याची अनुमानित लागत ३९५ कोटी रुपये एवढी तसेच रिच – २ येथील ६ मेट्रो स्टेशन पिली नदी, खसारा फाटा,ऑल इंडिया रेडियो,खैरी फाटा,लोक विहार,लेखा नगर मेट्रो स्टेशनचा समावेश आहे या सोबतच रिच – १ येथील अँट ग्रेड सेक्शन (जमिनीस्तर) १ .९ किमी लांबीचा मेट्रो ट्रॅक आणि २ मेट्रो स्टेशन ईको पार्क आणि मेट्रो सिटी मेट्रो स्टेशनचा समावेश आहे ज्याची प्रस्तावित खर्च २५२ कोटी एवढी असून कार्याचा कालावधी ३० महिन्याचा आहे.
• (आटोमोटिव्ह चौक ते लेखा नगर) : आटोमोटिव्ह चौक ते लेखा नगर पर्यतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लोक वस्ती, शाळा, कॉलेज, ट्रान्सपोर्ट प्लाझा, असून या परिसरातील नागरिक शहरात मोठ्या प्रमाणात दररोज प्रवास करतात या भागात मेट्रो सुरु झाल्याने परिवहनाचे सुलभ असे साधन येथील नागरिकांना होणार आहे.
• ईको पार्क आणि मेट्रो सिटी: मेट्रो स्टेशन मुळे मोठ्या प्रमाणात मिहान येथील कंपनी,आयआयएम,एम्स हॉस्पिटल,नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आदी परिसर थेट मेट्रोने जोडल्या जातील.
• नागपूर मेट्रो रेल फ़ेज – २ प्रकल्पाची विशिष्टये :
नागपूर मेट्रो रेल प्रकल्प फ़ेज – २, ची लांबी ४३.८ कि.मी असून यामध्ये ३२ मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या प्रकल्पाची अनुमानित लागत ६७०८ कोटी एवढी आहे.
• आटोमोटिव्ह चौक ते कन्हान :
लांबी : १३ कि. मी. स्टेशन : पिली नदी,खसारा फाटा,ऑल इंडिया रेडियो,खैरी फाटा,लोक विहार,लेखा नगर,कॅन्टोन्मेंट,कामठी पोलीस स्टेशन,कामठी नगर परिषद,ड्रॅगन पॅलेस,गोल्फ क्लब,कन्हान नदी
• मिहान ते बुटीबोरी ईएसआर :
लांबी : १८.७ कि. मी. स्टेशन: ईको पार्क स्टेशन,मेट्रो सिटी स्टेशन,अशोकवन,डोंगरगांव,मोहगांव,मेघदूत सिडको,बुटीबोरी पोलीस स्टेशन,म्हाडा कॉलोनी,एमआयडीसी – केईसी,एमआयडीसी – ईएसआर
• प्रजापती नगर ते ट्रांसपोर्ट नगर :
लांबी: ५. ५ कि. मी. स्टेशन: पारडी,कापसी खुर्द, ट्रांसपोर्ट नगर
• लोकमान्य नगर ते हिंगना:
लांबी : ६.६ कि.मी.स्टेशन: हिंगना माउंट व्ह्यू, राजीव नगर,वानाडोंगरी,एपीएमसी,रायपूर,हिंगना बस स्टेशन,हिंगना.