Saturday, January 11, 2025

Latest Posts

नागपुरात ग्राहकांसाठी ट्रायल रुम बंद

पाच दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे.अशात बाजारात खरेदीला उधान आले आहे. दिवाळीत विशेष करुन कपडे खरेदीकडे ग्रहकांचा अधिक कल असतो. त्यामुळे नागपूरच्या प्रत्येक कपड्यांच्या दुकानांसह माॅल मध्ये नागरिकांची तूफान गर्दी दिसून येत आहे. (No Trail Room Service on The Eve of Diwali Shopping Rush ) परंतु होणारी गर्दी पाहता अनेक माॅल व कपडे दुकानदारांनी  ट्रायल रुमची सोय बंद केली आहे.

सध्या दिवाळी निमित्त सर्वत्र खरेदीची धूम सुरु आहे. सायंकाळी बाजारात तूफान गर्दी होत आहे. दिवाळी महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात आल्याने नोकरदारांचे पगार ही झाले असून बोनसही मिळाला आहे. त्यामुळे खर्चाची परवा न करता ग्राहक बिनधास्त खरेदीला लागले आहेत. इलेक्ट्राॅनिक्स वस्तू, घर सजावटींच्या वस्तू, गाड्या, सोन्या चांदीचे दागिने, मिठाईसह भेट वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहे. एकंदरीतच दिवाळी निमित्त बाजारात चैतन्य बघायला मिळत असून करोडो रुपयांची उलाढाल होत आहे. परंतु दिवाळीत या वरील खरेदी पेक्षा कापड खरेदी ही सर्वात जास्त केली जाते. बाजारात शेकडो नामांकित कंपन्यांचे विविध ब्राण्डस् उपलब्ध आहेत. माॅल अथवा मार्केटमध्ये मोठी कपड्यांचे स्वातंत्र दालने देखील आहेत. अशात आता दिवाळी निमित्त सर्वत्र गर्दी होत आहे. मिहिलांपासून तर बच्चे कंपनी मोठ्या उत्साहात खरेदी करत आहे. मात्र खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांसाठी  ट्रायल रुमची सोय बंद केल्याने त्यांचा हिरमोड होत आहे. ( Nagpur Madhe Grahaka Saathi Trial Room Band) आपल्या मापाचे कपडे घालून पाहण्यासाठी असलेली ट्रायल रुमची सोय ग्राहकांच्या गर्दी अभावी अनेक ठिकाणी बंद करण्यात आली आहे. एक ट्रायल रुममध्ये एका ग्राहकाला जवळपास पाच ते दहा मिनिटे लागतात. तसेच ग्राहकांच्या तूलनेत ट्रायल रुम कमी पडत आहेत. ट्रायल रुममध्ये जाणाऱ्या वेळामुळे विक्रेत्याला त्याचा फटका बसत असून मर्यादित वेळेत कमी कपडे विकल्या जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. नेमकी हीच बाब हेरुन नागपूरात अनेक ठिकाणी ट्रायल रुम बंद करण्याचा निर्णय कापडे विक्रेत्यांनी घेतला आहे. तर याच गर्दीचा फायदा घेत अनेक जण केवळ टाईमपास करण्यासाठी देखील येतात. त्याचाही परिणाम कपडे खरेदीवर जाणवत आहे. नागपूरात संध्या माॅल संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने कपडे खरेदी बारा महिने केल्या जात आहे. मात्र दिवाळीच्या काळात होणारी कापड खरेदी इतर सणांच्या तुलनेत जास्त आहे.

Latest Posts

Don't Miss