Saturday, January 11, 2025

Latest Posts

नागपूर हिट अँण्ड रन प्रकरण : नेमकं काय घडलं

| TOR News Network |

Nagpur Hit and Run Case : रविवारी मध्यरात्री नागपूरात हिट अँण्ड रनचे प्रकरण घडलं आहे. यात एका ऑडी कारने रामदासपेठ भागात भरधाव वेगात तीन चार चाकी गाड्यांना धडक दिली. त्यानंतर एका दुचाकीलाही धडक दिली. त्यानंतर ही(Hit And Run Case in Nagpur) गाडी भरधाव वेगाने मानकापूर ब्रिजच्या दिशेने गेली. तिथेही एका गाडीला धडक देण्यात आली. त्यावेळी तिथे असलेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गाडी चालवत असलेल्या मुलांना गाडी बाहेर काढले. त्यांना चोप दिला. मिळालेल्या माहितीनुसार गाडीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे होता. (Sanket Bawankule hit And run Case) ती गाडी त्याच्या नावावर आहे. हा अपघात झाल्यानंतर गाडीची नंबरप्लेट लपवण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नागपुरातील रामदासपेठ परिसरात घडली आहे. सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी  दिलेल्या माहितीनुसार, संकेत बावनकुळे यांच्या  ऑडीने जितेंद्र सोनकांबळे यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर मोपेडला धडक दिली. त्यात प्रवास करणारे दोघे जखमी झाले. यानंतर मानकापूर परिसरातहही ऑडीने आणखी काही वाहनांना धडक दिली. तेथील एका टी-पॉइंटवर ऑडीने पोलो कारला धडक दिली (Audi Car Hit And Run Nagpur). त्यातील लोकांनी ऑडीचा पाठलाग करून मानकापूर पुलाजवळ अडवली. यात संकेत बावनकुळे याच्यासह तिघे पळून गेल्याचे त्यांनी सांगितले.

 या प्रकरणावरुन आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सर्व सामान्यांना एक कायदा आणि बड्या बापाच्या मुलांना एक कायदा असं आहे का? असा प्रश्न विचारला आहे तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊत यांनी निशाणा साधला आहे. तर शिवसेना उबाठा गट सुषमा अंधारे यांनीही हल्ला चढवला आहे. सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये ही गाडी toe करून आणताना दिसली मात्र गाडीची नंबर प्लेट गायब आहे. हाँ काय प्रकार आहे, असा सवाल त्यांनी विचारला होता. दुसरी महत्त्वाची बाब संकेत बावनकुळे आणि त्याचे 3 साथीदार ज्या लाहोरी बारमध्ये मद्यपान करत होते त्या बार आणि आसपासचे CCTV फुटेज तात्काळ हस्तगत करायला हवेत, असे त्यांनी नमूद केले आहे.

तर संजय राऊत म्हणालेत (Sanjay Raut on Nagpur Hit and Run Case)”गाडी बावनकुळेंच्या मुलाची आहे. तो गाडी चलवत होता. सर्व पुरावे नष्ट केलं. असं करत असाल तर कायद्याचं नाव घेऊन विरोधकांना त्रास देण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? नाहीये. फडणवीस तुम्ही त्या पदावर बसण्यास लायक नाहीत. निष्पक्ष चौकशी हे काय करणार? जोपर्यंत फडणवीस या पदावर आहेत तोपर्यंत कोणत्याही प्रकरणाची निष्पक्ष तपासणी होणार नाही. जोपर्यंत रश्मी शुक्ला डीजी आहेत तो निष्पक्ष तपासणी होणार नाही. कायदा फडणवीसांच्या कोठ्यावर नाचतोय. कायद्याला नाचवलं जात आहे. विकत घेतलं जात आहे. लोकांना चिरडून मारलं जात आहे. साधं एफआयआरमध्ये नावही नाही, लाहोरी रेस्तराँ बार आहे तेथील सीसीटीव्ही फुटेज काढा. कोण दारु पीत होतं. कोण दारुच्या नशेत गाडी चालवत होतं एकदा तपासून पाहा. त्याची सीसीटीव्ही फुटेज सापडणार नाहीत,” असं राऊत म्हणाले.

याच मुद्यावरून बोलताना बावनकुळे यांनी सर्वांसाठी न्याय एकसारखा असावा, दोषींवर कारवाई व्हावी,असे स्पष्ट केले. ‘ (Chandrashekhar Bawankule on hit and run case)नागपूर येथे झालेल्या अपघात प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी पूर्ण चौकशी करावी, कोणालाही वेगळा न्याय लावू नये व दोषींवर कारवाई व्हावी’, अशी स्पष्ट भूमिका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली.

Latest Posts

Don't Miss