Saturday, January 11, 2025

Latest Posts

हिवाळी अधिवेशनाचे कामकाज केवळ 10 दिवस

आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

Nagpur Winter Assembely 2023 : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे.या संदर्भात विधानभवनात आज (बुधवारी ता.29) सकाळ विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिकृत घोषणा करण्यात आली. (Nagpur Winter Assembely 2023 will be of 10 days) अधिवेशन सुट्ट्यासह एकूण दिवस १४ होणार असून प्रत्यक्षात कामकाज १० दिवस चालणार आहे.

नागपूरात विधींमंडळ हिवाळी अधिवेशन होऊ घातले आहे.त्या पाश्वभूमीवर आज बुधवारी सकाऴी विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.  या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार,मंत्री, दोन्ही सभागृहाचे सदस्य,विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे संबंधित मान्यवर उपस्थित होते. हिवाळी अधिवेशन गुरुवार दि. ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार दि.२० डिसेंबर २०२३ या कालावधीत पार पडणार आहे. अधिवेशन सुट्ट्यासह एकूण १४ दिवसांचे असेल.मात्र प्रत्यक्ष कामकाज १० दिवस चालणार आहे. यात शनिवार व रविवार असे ४ दिवस सुट्ट्यांचे असणार आहे.

Latest Posts

Don't Miss