Wednesday, January 15, 2025

Latest Posts

याला काय थंडी म्हणतात का राव

नागपूर राज्यातील तिसरे थंड शहर : गारठा वाढला

Nagpur Lowest Temperature 2023: विदर्भात थंडीचा कडाका वाढला असून, नागपूरसह संपूर्ण विदर्भात तीव्र लाट पसरली आहे. गारठ्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात नागपूरचे तापमान प्रथमच दहा अंशांच्या खाली आहे.  गेल्या २४ तासांत नागपूरच्या किमान तापमानात ३.४ अंश सेल्सिअसची घसरण झाली असून मंगळवारी पहाटे शहराचे किमान तापमान सिंगल डिजिटमध्ये (९.४ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. (Nagpur temperature goes down by 3.4 celsius ) हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, ओलावा आणि उत्तरेकडील वाऱ्यांचा अभाव यामुळे संपूर्ण विदर्भात थंडीचा जोर वाढला आहे. विदर्भात हा प्रकार सुरूच राहणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडीच्या लाटेसह किमान तापमान 6 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होऊ शकते.वाढलेल्या गारठ्यामुळे ही काय थंडी आहे का राव अशीच प्रतिक्रिया नागपूरकर देत आहे.

कमाल तापमान सरासरीपेक्षा 2.7 अंश सेल्सिअसने कमी असल्याने दिवसभर किमान तापमानात अचानक घसरण जाणवत होती. नागपूरचे कमाल तापमान २६.१ अंश सेल्सिअस होते. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांनी दिवसभर नागरिकांची अस्वस्थता वाढवली.

राज्यात सर्वाधिक थंडीची लाट सध्या विदर्भातच दिसत आहे. मंगळवारी गोंदिया व यवतमाळ येथे विदर्भासह संपूर्ण राज्यात नीचांकी अर्थात ९.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये लाटेचा तीव्र प्रभाव दिसून येत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे ग्रामीण भागातीलच नव्हे, शहरवासीही सध्या कमालीचे त्रस्त आहेत. दिवसाही बोचरे वारे वाहात असल्यामुळे स्वेटर व जॅकेट घालून फिरावे लागत आहे. शिवाय थंडी घालविण्यासाठी शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे.हवामान विभागाने या आठवड्यातही थंडीची लाट कायम राहणार असल्याचे संकेत दिल्याने सध्यातरी कडाक्यापासून वैदभींची सुटका शक्य नाही. उत्तर भारतात सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू असल्यामुळे मैदानी भागांमध्ये थंडीची लाट आली असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.वाढलेल्या थंडी मुळे ही काय थंडी आहे का राव अशीच प्रतिक्रिया नागपूरकर देत आहे.

Latest Posts

Don't Miss