Saturday, January 18, 2025

Latest Posts

तिने 300 कोटींच्या कंपनीला 8000 कोटींच्या घरात पोहचवले

| TOR News Network | CMO Nadia Chauhan News : कोणताही व्यवसाय घ्या त्यात मेहनत आणि कालांतराने बदल केल्या शिवाय तो झेप घेत नाही. अशात सर्वांना परिचीत असलेल्या पार्ले कंपनीने अलीकडे मोठे यश कमवले असून आपला व्यवसाय ३० पटीने वाढवला आहे.त्याचे सर्व यश हे पारले एग्रो कंपनीची मालकीण नादिया चौहान यांना जाता.नादिया चौहान यांनी  कुटुंबाचा व्यवसाय वाढवला आहे. ब्युटी विथ ब्रेन असा किताब मिरवणाऱ्या नादियाने कघीच परदेशात शिक्षण घेतले नाही ना तिच्याकडे मोठी पदवी आहे. तिने वडिलांच्या अनुभवाच्या बळावर 300 कोटींची कंपनीला 8000 कोटींच्या घरात पोहचवले आहे.(Parle business Growth by 8000 crore)

नादिया 2003 मध्ये वडील प्रकाश चौहान यांच्या पारले एग्रो कंपनीत रुजू झाली. (Nadia Chauhan Parle Agro) त्यावेळी कंपनीची उलाढाल 300 कोटी रुपये इतका होता. 2017 पर्यंत य कंपनीचा महसूल 4,200 कोटी रुपयांच्या घरात पोहचला. तर 2022-23 मध्ये या कंपनीने 8,000 कोटींचा महसूल मिळवला. कंपनीच्या या घौडदौडीत नादियाचा सिंहाचा वाटा आहे. 37 वर्षीय नादिया सध्या कंपनीची चिफ मार्केटिंग ऑफिसर आणि संयुक्त संचालक आहे. तिची मोठी बहिण शाऊना चौहान कंपनीची सीईओ आहे.

17 व्या वर्षीच कंपनी केली ज्वाईन

पारले एग्रो कंपनीची सुरुवात वर्ष 1985 मध्ये झाली होती. (Parle Agro Established in 1985) तेव्हा नादियाचा जन्म झाला होता. तेव्हा तिचे वडील प्रकाश चौहान हे स्वीडिश कंपनीच्या आंब्याच्या उत्पादनासाठी टेट्रा पॅक तयार करत होते. नादियाने पदवी मिळवल्यानंतर 17 व्या वर्षीच कंपनी ज्वाईन केली. तेव्हा कंपनीची 95 टक्के कमाई केवळ फ्रुटी या उत्पादनापासून होत होती.

अनेक उत्पादनं बाजारात आणले

नादियाने त्यांचे लक्ष इतर उत्पादनांकडे वळवले. 2005 मध्ये एपी फिज (Appy Fizz Drink) हे उत्पादन बजारात उतरविण्यात आलं. ते लवकरच लोकप्रिय झालं. त्यानंतर तिने इतर अनेक उत्पादनं बाजारात आणले. त्यामध्ये लिंबू पाणी हे पण एक उत्पादन आहे. त्यानंतर बहिणीसोबत तिने मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरु केले. कंपनीचे बाटलीबंद पिण्याचे पाणी बैले (Bailey mineral water) पण लोकप्रिय ठरले. या उत्पादनाच्या माध्यमातून कंपनीने 1,000 कोटींच्या व्यवसायाची उभारणी केली. 2030 पर्यंत कंपनीचा महसूल 20 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचे नादियाचे लक्ष आहे.(Nadia Chauhan Set New Target Upto 20 Thousand Cr)

Latest Posts

Don't Miss