Thursday, January 16, 2025

Latest Posts

शरद पवार अन् पाऊस…

परत पावसात भाषण : यंदा कुणाची विकेट जाणार

Sharad Pawar and Rain :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे जणू पावसासोबत एक घट्ट नाते असल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार यांची एक सभा म्हणजे विजयाची हमी, असं त्यांचे समर्थक सांगतात. गेल्यावेळी साताऱ्यात पोट निवडणूक लागली होती. उदयनराजे यांच्या विरोधात शरद पवार यांचे जुने मित्र श्रीनिवास पाटील अशी लढत होती. अशात शरद पवार मैदानात उतरले होते. त्यावेळी शरद पवार यांच्या पावसातल्या भाषणाची सर्वत्र चर्चा झाली अन् श्रीनिवास पाटील जिंकले. कालच्या नवी मुंबईतील पावसातल्या सभेनंतर शरद पवार परत चर्चेत आले आहे. त्यांच्या या भाषणाने कुणाची विकेट जाणार अशी चर्चा होते आहे.

2019 ला विधानसभा निवडणूक होत होती. साताऱ्यात पोट निवडणूक लागली होती अन् राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साताऱ्यात भर पावसात भाषण देत होते. तो दिवस तुम्हाला आठवत असेलच. शरद पवार यांनी भर पावसात भाषण दिलं अन् सातारकरांनी राष्ट्रवादीला भरभरून मतं टाकली. अशात राष्ट्रवादीचा विजय झाला. तेव्हा शरद पवार यांच्या या पावसातल्या सभेची प्रचंड चर्चा झाली. आता पुन्हा एकदा या प्रसंगाची पुनरावृत्ती झालीय. नवी मुंबईत शरद पवार सभेला संबोधित करणार होते. पण इतक्यात पावसाने हजेरी लावली मग काय… भर पावसात शरद पवार पुन्हा एकदा ‘बरसले’… (Sharad Pawar Navi Mumbai Rain Sabha)शरद पवार यांच्या सभेनंतर अनेकांना साताऱ्यातील सभेची आठवण झाली.

खुर्च्या डोक्यावर घेत ऐकले भाषण

नवी मुंबईच्या बामणदेव झोटिंगदेव मैदानावर राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा आणि महिला बचत गट मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा शरद पवार यांनी संबोधित केलं. यावेळी कार्यकर्त्यांना उमेद भरण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं. तर बचत गटाच्या महिलांना संघर्ष करण्याचा कानमंत्र त्यांनी दिला. निराशा हा विषय आपल्या मनामध्ये कधी येता कामा नये. त्या निराशेवर मात करून संघर्ष करू. धैर्यानं पुढे जाऊ. हाच कार्यक्रम राबवायचा निर्धार आजच्या दिवशी आपण करूया, असं म्हणत शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं. पावसात सुरु असलेलं हे भाषण लोक खुर्च्या डोक्यावर घेत ऐकत होते. शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यासह नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे अन्य नेतेमंडळी स्टेजवर होते.

Latest Posts

Don't Miss