पत्रकार परिषदेतून संजय राऊत यांच्यावर केले गंभीर आरोप
Mumbai Kirit Somaiya Press Brief : मधल्या काळात एका आक्षेपार्ह व्हिडीओमुळे गायब झालेले भाजपचे नेते किरीट सोमय्या परत अॅक्शन मोडवर आले आहेत. ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांना कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अटक केली.या अटकेनंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली.(Mumbai Kirit Somaiya Press) यात त्यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केलेत. (Sanjay Raut Family Involved in khichadi scam) संजय राऊत यांची कन्या विधिता राऊत , भाऊ संदीप राऊत आणि सुजित पाटकर यांच्या खात्यात खिचडी घोटाळ्यातील लाखो-करोडो रुपय गेले.(Khichadi Scam Money Transfer To Sanjay Raut Relatives) याची सर्व चौकशी झाली पाहिजे, असं किरीट सोमय्या म्हणालेत.(Kirit Somaiya Demands Inquiry of sanjay Raut)
सुरज चव्हाण यांनी 132 कोटी रुपयांचा खिचडी कॉन्ट्रॅक्ट्स दिलं. पेमेंट केलं. त्यामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या पार्टीच्या अनेक नेत्यांचे बेनामी कंपनींना सुरज चव्हाण यांच्या खात्यात दीड कोटीहून अधिक रुपये गेले. अमोल गजानन कीर्तीकर यांच्या खात्यात देखील कोट्यवधी रुपय गेले. रवींद्र वायकर प्रकरण हिशोब द्यावा लागेल. महापालिकेने परवानगी दिली. इकबाल सिंह चहल यांनी परवानगी दिली, त्याबाबत ईडीने विचारलं पाहिजे. परवानगी कशी दिली? खेळाचे मैदान आहे कशी परवानगी दिली?, याची चौकशी व्हायला पाहिजे, असं सोमय्या म्हणालेत.
सूरज चव्हाण यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. सूडाच्या भावनेतून अटक झाली असल्याचं राऊत म्हणाले.(Sanjay Raut On Suraj Chavan Arrest) त्यांच्या या टीकेला सोमय्यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत चोर कोतवालला बोलत आहे. तुमच्याकडे जे पैसे आलेत त्याचा हिशोब द्या. पत्राचाळ तुमच्या बायकोच्या खात्यात पैसे आले होते. त्याचा हिशोब द्या. नाहीतर जेलमध्ये जावं लागले.तुम्ही पाप केलं. त्याचा हिशोब तर द्यावा लागेल, असं सोमय्या म्हणालेत.