Monday, November 18, 2024

Latest Posts

मुंबईकडून रोहित शर्माला कर्णधारपदाची ऑफर

| TOR News Network | Mumbai Indians Latest News : मुंबई इंडियन्सने 15 डिसेंबर 2023 रोजी रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन काढून हार्दिक पंड्या याला कर्णधार केले होते. मुंबईच्या सलग तीन सामन्यांत झालेल्या पराभवामुळे संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, नीता अंबानी यांनी रोहित शर्मा याला पुन्हा कर्णधारपदाची ऑफर दिल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.(Neeta Ambani offer to Rohit sharma) परंतु रोहित शर्मा यांनी ही ऑफर नाकारत सडेतोड उत्तर दिले आहे.(Rohit Sharma refused captaincy for mumbai)

काय म्हटले रोहित शर्माने

मीडिया रिपोर्ट्स नुसार, नीता अंबानी यांनी रोहित शर्मा याला कर्णधारपदाची ऑफर दिल्यानंतर रोहितने स्पष्टपणे नकार दिला. तसेच आयपीएलचा हा सीजन संपल्यावर मुंबईकडून खेळणार नसल्याचे नीता अंबानी यांना सांगितले आहे. (Rohit will not play from mumbai) यामुळे आयपीएल 2025 (IPL 2025)मध्ये रोहित शर्मा नवीन संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. (Rohit sharma will play for new team in ipl 2025) परंतु अधिकृतरित्या ही माहिती देण्यात आलेली नाही. आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्माने 3 सामन्यांत 69 धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा पुढे पर्याय

रोहित शर्मा 2011 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्यास सुरुवात केली होती. त्याच्या कर्णधारपदाच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाने पाच वेळा विजेतेपद मिळवले. परंतु यावर्षी रोहित शर्माचे कर्णधारपद अचानक काढून घेण्यात आले. मुंबईच्या या निर्णयावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मुंबई इंडियन्यच्या अनेक समर्थकांनी रोहित शर्माला पाठिंबा देण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाला अनफॉलो केले होते. आता मुंबई इंडियन्सची साथ सोडल्यानंतर रोहित शर्मापुढे तीन पर्याय असल्याचे म्हटले जात आहे. दिल्ली कॅपिटल्स (DC), सनराइजर्स हैदराबाद (SRH) किंवा पंजाब किंग्स (PBKS) संघाकडून रोहित शर्मा खेळण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये मुंबई संघाच्या पुढील कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. मुंबईचा चौथा सामना 7 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सच्या संघासोबत होणार आहे.

Latest Posts

Don't Miss