Monday, January 13, 2025

Latest Posts

राणा दाम्पत्याला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश

| TOR News Network | Navneet Rana Hanuman Chalisa Case Update : नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसा पठन करण्याचा अट्टहास राणा दाम्पत्याने केला होता. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी आरोप निश्चितीसाठी सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे.(Rana’s hearing at mumbai court) न्यायालयात सुनावणीवेळी अनुपस्थित राहिल्यानं राणा दाम्पत्याला ९ मे रोजी हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. (Rana couple directed to appear in mumbai court)

अमरावतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा व त्यांचे पती बडनेराचे आमदार रवी राणा यांनी एप्रिल २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा पठणचा प्रयत्न करून मोठा गोंधळ निर्माण केला होता.(Navneet Rana Hanuman Chalisa case) यातून त्यांनी सामाजिक वातावरण कलुषित केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

या प्रकरणी दोघांनी दोषमुक्ततेसाठी कोर्टात अर्ज केला होता मात्र, सत्र न्यायालयाने तो फेटाळला. (Sessions Court rejected Application of rana) त्यानंतर आता आरोप निश्चितीसाठी सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असून आज न्या. राहुल रोकडे यांच्या समोर या प्रकरणी सुनावणी पार पडली.

अमरावतीत मतदान असल्यानं राणा दाम्पत्यानं न्यायालयात हजेरीपासून सूट द्यावी असा अर्ज अॅड. शब्बीर शोरा यांच्यामार्फत केला होता. मतदानाचं कारण विचारात घेत न्यायालयानं दाम्पत्याला एक दिवस गैरहजर राहण्याची मुभा दिली. पण आता ९ मेच्या सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब केली. (Instructions to Rana couple from mumbai court)

Latest Posts

Don't Miss