Monday, January 13, 2025

Latest Posts

मुंबईत भाजपकडून पाच नव्या चेहऱ्यांना संधीची शक्यता

पूनम महाजन, मनोज कोटक व  गोपाळ शेट्टी यांना डच्चूची चर्चा

| TOR News Network | Maharashtra BJP Candidate List : आज रात्री भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या महितीनुसार मुंबईतून पाचही नव्या चेहऱ्यांना भाजप संधी देण्याची शक्यता आहे. तसेच विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक आणि पूनम महाजन या तिघांची तिकिट कापण्याची चर्चा आहे. (Bjp Second list to declared today)

भाजप मुंबईतील सहापैकी पाच जागा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत युतीत लढताना भाजप-शिवसेना मुंबईत समसमान तीन-तीन जागा लढवत असे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपचे प्रत्येकी तीन खासदार निवडून आले. त्यापैकी शिवसेनेचे दोघे खासदार एकनाथ शिंदेंसोबत आले. त्यामुळे विद्यमानांना पुन्हा संधी देण्याच्या शब्दानुसार शिंदेंना मुंबईत किमान दोन जागा मिळणे अपेक्षित होते. परंतु युतीत शिवसेनेकडे असलेले ठाणे आताचे खासदार ठाकरे गटात असल्यामुळे भाजपने स्वतःकडे घेतलं होतं. परंतु डीलनुसार ठाण्यातील जागेच्या मोबदल्यात भाजपने उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे वळला आहे, तर ठाणे मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं आहे.

उत्तर मुंबई केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना दिला जाणार

दुसरीकडे, युतीत शिवसेनेकडे, परंतु सध्या ठाकरे गटाकडे असलेली दक्षिण मुंबईची जागाही भाजपच लढवणार आहे. शिंदेंतर्फे सध्या दक्षिण मध्य मतदारसंघातून राहुल शेवाळे हे एकमेव मुंबईतून रिंगणात उतरणारे विद्यमान खासदार असतील.दरम्यान, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून गजानन कीर्तिकर यांच्याऐवजी आता भाजप आमदार अमित साटम यांना संधी मिळण्याची चिन्हं आहेत. तर उत्तर मुंबई हा गोपाळ शेट्टी यांनी मोठ्या मताधिक्याने राखलेला सेफ मतदारसंघ केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना दिला जाणार आहे.(North Mumbai seat to Piyush Goyal)

मनोज कोटक यांच्याऐवजी प्रवीण दरेकर

विशेष म्हणजे, उत्तर मध्य मुंबईतून प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि दोन वेळ खासदार पूनम महाजन यांच्याऐवजी मुंबई भाजप अध्यक्ष आणि माजी मंत्री आशिष शेलार यांना उतरवलं जाण्याची शक्यता आहे. परंतु शेलार अनुत्सुक असल्याचं बोललं जातं. तर ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्याऐवजी प्रवीण दरेकर किंवा आमदार पराग शहा यांची नावं चर्चेत आहेत. (From North East Mumbai Pravin Dareker)दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर यांच्या नावावर मोहर उमटण्याची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss