| TOR News Network |
Mp Varsha Gaikwad Latest News : राज्य विधानसभा निवडणका बघता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहरा कोण असेल, हा चर्चेचा विषय़ ठरत आहे. (Maharashtra Cm Face News) रोज कोणत्या ना कोणत्या नेत्याचे नाव समोर येत आहे. अशात आता काँग्रेसच्या नेत्या व खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण असू शकतात यां संदर्भात वक्तव्य केले आहे.(Varsha Gaikwad On Women Cm Face) यात त्यांनी आपला पक्ष सोडून घटक पक्षातील महिल्या नेत्यांची नावे घेतली आहे हे विशेष.
खासदार वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास महिला मुख्यमंंत्री होऊ शकते का? असा प्रश्न वर्षा गायकवाड यांना विचारला असता वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘महाविकास आघाडीतील सर्व पक्षांकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळणाऱ्या महिला आहेत.(Mahavikas agadhi Women Leader Can Handle Post of cm) शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडे, सुप्रिया सुळे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे रश्मी ठाकरे आहेत. (Supriya sule,Rashmi Thackeray would be Cm Face Says Varsha Gaikwad) आमच्या पक्षाकडेही महिला नेत्या आहेत. पण त्याबाबतचा निर्णय निवडून आलेले आमदार घेतात.
महाराष्ट्राची पुरोगामी आणि प्रगत राज्य म्हणून ओळख आहे. महाविकास आघाडीपैकी कुठल्याही पक्षाची महिला मुख्यमंत्री झाली तरीही मला आनंदच होईल. महिलांना खूप संघर्ष करावा लागतो. आमच्यासमोर इंदिरा गांधींचा आदर्श आहे. सोनिया गांधींनाही आम्ही संघर्ष करताना पाहिलं आहे. पण भाजपकडे बघा, भाजपमध्ये महिलांना मंत्रिपदही दिले जात नाही. (Varsha Gaikwad Slams Bjp) पक्षाचे अध्यक्षपद दिले जात नाही. महत्त्वाची बाब म्हणजे आता आपण 50 टक्के आरक्षणही लागू केलं असून महाराष्ट्र त्यात आघाडीवर आहे, असेही वर्षा गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले.