Saturday, January 11, 2025

Latest Posts

मोदींसारखा आम्ही 405 चा दावा करणार नाही पण आमच्या येवढ्या जागा पक्क्या

| TOR News Network | Sanjay Raut on Lok Sabha Elections : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात महायुतीच्या 45 प्लस जागा येथील असे आकडे सांगत आहेत. त्यांचा आकडा काहीही असेल मात्र निवडणुकीनंतर भाजपाला आकडे लावायचच काम करावं लागणार आहे अशी बोचरी टीका ठाकरे सिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केली. (Sanjay Raut Slams fadnavis)

संजच राऊत म्हणाले परिवर्तनाची सुरुवात विदर्भातून होते.(Transformation starts from Vidarbha) शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम्ही त्याकडे महाविकास आघाडी म्हणून पाहतो. रामटेकला आमचा उमेदवार नाही, पण आमचे लोक कामाला लागलेत. हळूहळू रंग चढत जाईल असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सी व्होटर सर्वेने महाराष्ट्रात महाविकास आघाडीला काही जागा दाखवल्या आहेत, त्यावर राऊत म्हणाले की, “जे काही त्यांनी दाखवलय, त्याच्याशी सहमत नाही.(We dont belive C Voter Survey) महाराष्ट्रात आम्ही 100 टक्के यश मिळवण्याच्या मार्गावर आहोत.(We are on way to success in maharashtra)

“देवेंद्र फडणवीस त्यांच्यासाठी 45 प्लसचा आकडा सांगतात. त्यांचा आकडा काहीही असेल, निवडणुकीनंतर भाजपाला आकडे लावायचच काम करावं लागणार आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 जागा जिंकेल, (Mahavikas aghadi will win 35 seats in maharashtra) देशात इंडिया आघाडीला 305 जागा मिळतील” असा दावा संजय राऊत यांनी केला. (Sanjay raut claims 305 seats in india)

मोदींसारखा आम्ही 405 चा दावा करणार नाही’ असं ते म्हणाले. “विरोधकांच रामावरच प्रेम नकली, राजकीय ढोंग आहे. कोणताही संघर्ष, लढ्यात ते नव्हते. राम पळपुट्यांच्या मागे उभा राहत नाही. जे मैदानावर उभे राहून आत्मविश्वासाने लढतात, राम त्यांच्यामागे उभा राहतो” असं संजय राऊत म्हणाले.

Latest Posts

Don't Miss