Saturday, January 11, 2025

Latest Posts

प्रतिभा धानोरकरांनी मानले भाजपच्या लोकांचे आभार

| TOR News Network |

Pratibha Dhanorkar Latest News : चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून भाजप नेते सुधिर मुनगंटीवार यांचा मोठा पराभव झाला आहे.काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या जायंटकिलर ठरल्या आहेत. प्रतिभा धानोरकर यांनी 2 लाख 60 मतांच्या फरकाने विजय नोंदवला. (Pratibha dhonarkar lead more than 2 lakh) या विजयानंतर प्रतिभा धानोरकर यांनी आतली बातमी सांगत मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Pratibha dhanorkar told inside story) विजयामध्ये कोणाची मदत झाली हे सांगितल्यानंतर सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

विजयी झाल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांच्या विजयी रॅलीचे वणी येथे नियोजन केले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधीत केले. काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांने गावागावात जावून प्रचार केला. फाटका कार्यकर्त्याही छातीठोक पणे सांगत होता ताई विजय तुमचाच होणार, त्यामुळे आपला विजय पक्का होता हे सुरूवातीपासूनच माहित होते असे यावेळी धानोरकर म्हणाल्या. (People was confident about my win) निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मदत केलीच त्याबद्दल त्यांचे आभारही त्यांनी मानले. मात्र पडद्या मागून भाजपच्या लोकांनीही मदत केली. काँग्रेसला मतदान व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले असा दावा त्यांनी यावेळी केला. (Dhanorkar claim bjp support in election) त्या सर्व भाजपच्या लोकांचेही त्यांनी आभार मानले.

प्रतिभा धानोरकरांनी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांमध्ये सर्वाधिक मताधिक्य घेतले आहे.(Dhanorkar highest lead among all congress candidate) त्यांना एकूण 7 लाख 18 हजार 410 मते मिळाली. त्यांनी भाजपच्या सुधिर मुनगंटीवार यांचा जवळपास 2 लाख 60 हजार 406 मतांनी पराभव केला. याबाबत बोलताना त्यांनी आपल्याला पंतप्रधानापेक्षाही जास्त लीड मतदारांनी दिल्याचा आवर्जून उल्लेख केला. (Dhanorkar more lead than pm modi)

Latest Posts

Don't Miss