Thursday, January 16, 2025

Latest Posts

खासदार ओमराजे निंबाळकर अडचणीत, गुन्हा दाखल

| TOR News Network |

Omraje Nimbalkar Latest News :धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Om Rajenimbalkar in trouble) आणि त्यांचे सहकारी आमदार कैलास पाटील (Mla Kailas Patil) यांनी अंगरक्षकासह मतमोजणी केंद्रात मुक्त संचार केल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे (Dharashiv Collector Sachin Ombase) यांनी  काढले आहेत.(Case Registered on Mp Omraje Nimbalkar) लोकसभा निवडणूकीत ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा पराभव केला होता. आता अर्चना पाटीलमुळे खासदार ओमराजेंच्या अडचणी वाढत असल्याची चर्चा सुरु आहे.(Archana Patil Complaint About Omraje Nimbalkar)

अर्चना पाटील यांच्या उमेदवार प्रतिनिधींनी तक्रार केली होती. 4 जून 2024 रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.(Loksabha Election Result Declare) त्यादिवशी मतमोजणी केंद्रात विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे त्यांच्या अंगरक्षकांसह मुक्त संचार करीत होते.(OmRaje Nimbalkar at counting centre with bodyguard) त्यामुळे मतमोजणी अधिकारी , कर्मचाऱ्यांवर दबाव निर्माण झाला आणि आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार अर्चना पाटील यांचे उमेदवार प्रतिनिधी  रेवणसिद्ध लामतुरे यांनी ६ जून रोजी केली होती.

धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा ३ लाख २९ हजार ८४६ मतांनी पराभव केला होता.राजेनिंबाळकर आणि पाटील कुटुंबातील वाद सर्वश्रूत असून शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्यात लोकसभा निवडणूकीत हायव्होल्टेज ड्रामा पहावयास मिळाला. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या स्नूषा व भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा पराभव केल्यानंतर लोकसभेच्या निकालादिवशी ओमराजे निंबाळकर यांचा त्यांच्या अंगरक्षकासह मतमोजणी केंद्रात मुक्तसंचार सुरु असल्याने आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार अर्चना पाटील यांच्याकडून करण्यात आली होती.(code of conduct by omraje nimbalkar) यावर धाराशिवचे जिल्हाधिकारी सचीन ओम्बासे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Latest Posts

Don't Miss