Sunday, January 12, 2025

Latest Posts

नवनीत राणा अमरावतीतून फायनल : कमळावर लाढण्याची जोरदार चर्चा

| TOR News Network | Navneet Rana latest News : भाजपने लोकसभेसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. मात्र यात अमरावती लोकसभा मतदारसंघाचे नाव नाही. अशात या यादीनंतर पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे काल रात्री आमदार रवि राणा यांनी नागपूरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. (Ravi rana meet devendra Fadnavis) त्यात अमरावतीच्या जागे बद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवेल अशीही चर्चा आहे. (navneet rana Seat final from amravati loksabha)

अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणे निश्चित आहे, (Navneet rana will contest loksabha from Bjp)अशी माहिती सूत्रांकडून मिळालीये. नवनीत राणा कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढल्यास आमदार रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष खासदार नवनीत राणा यांना निवडणुकीत पाठिंबा देणार, अशी चर्चा सुरू आहे.

रवी राणा देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट

कालच आमदार रवी राणांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर या चर्चेला आणखी उधाण आलं आहे. 2014 मध्ये नवनीत राणा राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणुकीत उभ्या असताना तेव्हाही आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता.(Yuva Swabhiman Party will support Navneet rana)

शिवाजीराव आढळराव पाटील इच्छूक

अमरावती लोकसभा मतदार संघात शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील महायुतीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे नवणीत राणा यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरच महायुतीचा पाठिंबा मिळेल अशी चिन्हे आहेत. त्यावर आता नवणीत राणा काय निर्णय घेणार याकडे अमरावतीकरांचं लक्ष लागलं आहे.

Latest Posts

Don't Miss