यंदाच्या आयपीएल २०२४ मध्ये गुजरात टायटन्स संघाला एक मोठा धक्का बसला आहे.भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार असून तो यंदाच्या आयपीएल सामन्यांना मुकणार आहे. (Mohammad Shami will Not Play IPL 2024)
शमीच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. (Shami Injured )माध्यमातील वृत्तानुसार मोहम्मद शमी आयपीएल २०२४ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. (Shami Out Of IPL 2024 )मोहम्मद शमी आयपीएल स्पर्धेतून बाहेर होणं हा गुजरात टायटन्स आणि भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे.
आयपीएल २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी…
मोहम्मद शमी हा गुजरात टायटन्स संघातील प्रमुख गोलंदाज आहे. गेल्या हंगामात गुजरातला स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहचवण्यात शमीने मोलाची भूमिका बजावली होती. त्याने या हंगामातातील १८ सामन्यांमध्ये १८.६१ च्या सरासरीने २८ गडी बाद केले होते.
बीसीसीआयच्या एका सुत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटले की, ‘ पायाच्या दुखापतीमुळे मोहम्मद शमी आयपीएल स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याला शस्त्रक्रियेची गरज आहे. ही शस्त्रक्रिया युकेमध्ये होणार आहे.
गुजरातचा मॅचविनर गोलंदाज..
शमी हा गुजरात टायटन्स संघाचा मॅचविनर गोलंदाज आहे. त्यामुळे त्याचं स्पर्धेतून बाहेर होणं हा गुजरात टायटन्ससाठी तगडा झटका असणार आहे. २०२२ मध्ये झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सने त्याला ६.२५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. त्याच्या या स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ११० सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना २६.८६ च्या सरासरीने १२७ गडी बाद केले आहेत.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दमदार कामगिरी
शमीने २०२३ वर्ल्डकप स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. या स्पर्धेतील ७ सामन्यांमध्ये त्याने १०.७१ च्या सरासरीने २४ गडी बाद केले होते. मुख्य बाब म्हणजे त्याला या स्पर्धेतील सुरुवातीच्या ४ सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र जेव्हा त्याला संधी मिळाली त्याने संधीचं सोनं करुन दाखवलं.