| TOR News Network |
Sanjay Raut On Modi : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात एक प्रकारे मार्शल लॉ सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे.(Marshal Law in State India) मोदी यांच्या पायाखालची बहुमताची सतरंजी मतदारांनी ओढून घेतली तरी मोदी सुधारायला तयार नाहीत. (Sanjay Raut Slams Modi) मोदी यांना सुधारण्याची, स्वतःला दुरुस्त करण्याची संधी होती, पण ते अवघडच दिसत आहे”, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.
“मोदी हे भाषणात खोटेपणाचे पतंग उडवतात. त्यांच्या उडवाउडवीचा जनतेला वीट आला आहे. मोदी यांच्या पायाखालची बहुमताची सतरंजी मतदारांनी ओढून घेतली तरी मोदी सुधारायला तयार नाहीत. (No Majority to modi) मोदी यांना पन्नास वर्षांपूर्वीच्या आणीबाणीने अकारण त्रस्त केले आहे. खरे तर मोदी यांना त्रस्त व्हायचे कारण नाही. कारण आणीबाणीपेक्षा भयंकर स्थिती त्यांच्या राज्यात सुरू आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी ‘सामना’ अग्रलेखातून केली आहे.(Sanjay Raut Criticise Modi) “श्रीमती गांधी यांनी घोषित आणीबाणीच लावली. मोदी यांच्या राज्यात तर एक प्रकारे ‘मार्शल लॉ’सारखीच स्थिती निर्माण झाली आहे. मोदी यांना सुधारण्याची, स्वतःला दुरुस्त करण्याची संधी होती, पण ते अवघडच दिसत आहे. नरेंद्र मोदी यांच्यात बदल होईल काय? (म्हणजे ते आता तरी सुधारतील काय?) असा प्रश्न अनेकांना अनेकदा पडत असेल.(Will Modi Change is a question to all) पंतप्रधानपदावर तीन वेळा बसलेल्या व्यक्तीने निदान देशाला भ्रमित करण्याची, खोटे बोलण्याची सवय तरी सोडून दिली पाहिजे, पण तिसऱ्यांदा शपथ घेऊनही मोदी बदलायला तयार नाहीत. त्यांचे फेकणे सुरूच आहे”, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.
“राज्यसभेतील त्यांचे बुधवारचे भाषण हा फेकाफेकीचा उत्तम नमुना आहे.(Sanjay Raut On Modi Speech) मोदी यांना आता विकासावर बोलावेसे वाटले. मागच्या दहा वर्षांत विकास वगैरे काही झालेला नाही. देशातील 80 कोटी लोकांना महिन्याला माणशी पाचेक किलो धान्य फुकटात देणे याला मोदी विकास मानत असतील तर ते देशाला फसवत आहेत”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
“राज्यसभेतील एक सदस्य मनोज झा यांनी सांगितले, ‘‘ग्रामीण भागात आता मजूर मिळत नाहीत. लोकांना घरबसल्या फुकट धान्य मिळते.(Free Grain Makes labour lazy) त्यामुळे लोक आळशी होत आहेत. मजूर मिळत नसल्याने कामे रखडली आहेत.’’ मोदी व त्यांच्या सरकारने गरिबी निर्मूलनाच्या नावाखाली कोटय़वधी लोकांना घरबसे व आळशी केले. घरी बसा व फुकटात धान्य घ्या, त्या बदल्यात आम्हाला मते द्या, अशी मोदी यांची भूमिका दिसते. मोदी यांनी त्यांच्या भाषणात जे पतंग उडवले तेदेखील नेहमीचेच होते. तीच दारू, तीच बाटली, बाकी काय? मोदी यांनी भ्रष्टाचार निपटून काढण्याचा जुनाच नारा दिला. भ्रष्टाचाऱ्यांना, गुन्हेगारांना सोडणार नाही. ईडी, सीबीआयच्या नावाने उगाच बोंब मारू नका.(Sanjay Raut on ED,CBI) या संस्था उत्तम काम करीत असल्याचे मोदी सांगतात तेव्हा आश्चर्य वाटते. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या घरगडय़ाप्रमाणे वागत आहेत”, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.