Thursday, January 16, 2025

Latest Posts

मिस्टर मोदी आपण स्वतःचे कुटुंब कुठे आहे हे शोधावं

| TOR News Network | Sanjay Raut On Modi : महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधानांनी शरद पवार यांच्यावर चौफेर हल्लाबोल केला.(Narendra modi slams sharad pawar) त्याला पवारांनी सडेतोड उत्तर दिले. महाविकास आघडीने पण मोदींवर जोरदार प्रहार केला. आता खासदार संजय राऊत यांनी पण मोदींवर तोफ डागली आहे.(Sanjay Raut Slams modi) मोदींच्या आरोपांना पवारांनी उत्तर दिल्यानंतर राऊतांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

मोदींनी शरद पवार यांच्यावर कुटुंब सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार, अशी टीका केली होती.(Pawar Can’t take care of family) त्या वक्तव्याचा राऊतांनी समाचार घेतला. मिस्टर मोदींनी दोन दिवस बारामतीत येऊन राहावं आणि अभ्यास करावा. कुटुंबाकडे फार सकारात्मक दृष्टीने पहावं आणि मग स्वतःचा कुटुंबा कुठे आहे हे शोधावं, (Modi where is your family)असा टोला राऊतांनी मोदींना हाणला.

शरद पवारांचा कुटुंब हे मजबूत एक संघ आहे तुम्ही एका दुसऱ्या माणूस त्यांच्या कुटुंबात दहशतीच्या बळावर फोडला असेल तुरुंगाचे भय दाखवून आणि तो पळून गेला असेल याचा अर्थ कुटुंब फुटला असं नाही.पवारांचं कुटुंब म्हणजे फक्त पवार कुटुंब नाही पुऱ्या महाराष्ट्रातील अनेक घर हे त्यांचे कुटुंब आहेत. (Sharad pawar is family for maharashtra) ठाकरे परिवारातील आम्ही सगळे एक कुटुंब आहोत हे त्यांना नरेंद्र मोदी यांना कळणार नाही कारण त्यांचा कुठं कुटुंबाशी संबंध आला, अशी खोचक टीका राऊतांनी केली.

Latest Posts

Don't Miss