Saturday, January 18, 2025

Latest Posts

मनसेचं मुख्य अन्न सुपारी- संजय राऊत

| TOR News Network |

Sanjay Raut Latest News : सिंचन घोटाळ्या प्रकरणी खूली चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले होते. ही बाबत देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला दाखवली होती. आर. आर. पाटील यांना आपण जपलं होतं. त्यांची काळजी घेतली होती. असं असतानाही आर. आर. आबांनी आपला केसाने गळा कापला असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. (Ajit Pawar on R R Patil) त्यांच्या या वक्तव्याचा समाचार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे. (Sanjay Raut on Ajit Pawar) आबांचे केस हे खूप लहान होते. त्यामुळे ते केसाने गळा कापू शकत नाही असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला आहे. यावेळी त्यांनी नाव न घेता मनसेला देखील धारेवर धरले.(Sanjay Raut On Mns)

सिंचन घोटाळ्याची खुल चौकशी करण्याची परवानगी आर. आर. पाटील यांनी दिली होती. ( irrigation scam case) यावरून सध्या राजकारण चांगलच तापलं आहे. अजित पवारांनी या पार्श्वभूमीवर आर. आर. पाटील यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. मात्र आर. आर. पाटील हे अत्यंत प्रामाणिक आणि कर्तबगार गृहमंत्री होते असे संजय राऊत यांनी सांगितले. (Sanjay Raut on R R Patil) गृहमंत्री म्हणून त्यांनी काही चुकीचं काम केलं असं आम्हाला वाटत नाही असेही राऊत म्हणाले. चौकशीचे आदेश देण्याची सही जर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना दाखवली असेल तर तो गोपनियतेचा भंग आहे.

मंत्री किंवा मुख्यमंत्रिपदावर बसलेल्या वक्तीला पदावर बसताना गोपनियतेची शपथ दिली जाते. या शपथेचाच फडणवीस आणि पवारांनी भंग केला आहे. त्यामुळे राज्यपालांनी त्याची दखल घेवून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी राऊत यांनी केली. या सर्व गोष्टी गोपनिय असताना त्या सर्वां समोर कशा आल्या असा प्रश्नही यावेळी राऊत यांनी केला. विधानसभेच्या प्रचारा वेळी अजित पवारांनी ही बाब जाहीर पणे सांगितली होती.

यावेळी संजय राऊत यांनी मनसेचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टिका केली. राज्यात काही राजकीय पक्ष आहेत. ज्यांचे मुख्य अन्न हे सुपारी आहे. (Sanjay Raut Slams MNS) ते सुपारीवरच जगतात. अशा पक्षांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार पाडण्याची सुपारी घेतली आहे. अशा पक्षांनाही या निवडणुकीत जनता जागा दाखवेल असंही ते म्हणाले.

Latest Posts

Don't Miss