Saturday, January 18, 2025

Latest Posts

पदवीधर मतदार संघातून मनसे बॅकफुट वर

| TOR News Network |

Graduate Constituency Latest News : मनसेने अचानक कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. (Mns On BackFoot From Graduate Constituency) मनसेने या मतदार संघातून अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. (Abhijit panse withdraw from Graduate Constituency) महायुतीत असूनही कोणत्याही चर्चे शिवाय मनसेने उमेदवार जाहीर केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. लोकसभेला राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठींबा दिला होता. त्यानंतर लगेचच जाहीर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत मात्र त्यांनी भाजप विरोधात आपला उमेदवार मैदानात उतरवला होता. मात्र त्यांनी तिथूनही माघार घेतली आहे.“देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेत विनंती केली होती, (Fadnavis request Raj Thackeray) त्या विनंतीला मान देऊन आम्ही माघार घेत आहोत” असं नितीन सरदेसाई यांनी प्रसार माध्यमांसी बोलताना सांगितलं. (nitin sirdesai to media)

मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी कोकण पदवीधरची निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली होती. सातत्याने ते नोंदणी करुन घेत होते. राज ठाकरेंनी सुद्धा या निवडणुकीत लक्ष घातलं होतं. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मनसेने आपला निर्णय बदलला आहे. (fadnavis meet raj Thackeray) त्या बद्दल नितीन सरदेसाई यांनी माहिती दिलीय. “दोन दिवसापूर्वी 3 जूनच्या संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली, त्या विनंतीला मान देऊन राज ठाकरे यांनी कोकण पदवीधरची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. (Mns Withdraw from Graduate Constituency) पानसे अर्ज भरणार नाहीत, निरंजन डावखरे उमेदवार असतील” असं नितीन सरदेसाई म्हणाले. (niranjan davkhare Candidate for Graduate Constituency)

“निरंजन डावखरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. त्यांनी राज ठाकरे यांचा आशिर्वाद घेतला. (Niranjan davkhare meet raj thackeray) त्यानंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं” असं सरदेसाई म्हणाले. तुम्ही निरंजन डावखरे यांना समर्थन देणार का? या प्रश्नावर नितीन सरदेसाई म्हणाले की, “त्या बद्दल राज ठाकरेच बोलतील. पण अशी गोष्ट वारंवार होणार नाही” “देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही हा निर्णय घेतलाय. आमचा स्वतंत्र पक्ष आहे. या वेळेला पाठिंबा दिला आहे. अशा पद्धतीची गोष्ट वारंवार होणार नाही, हे सुद्धा स्पष्ट केलय” असं नितीन सरदेसाई म्हणाले.

Latest Posts

Don't Miss