Saturday, January 18, 2025

Latest Posts

मुंबई लुटणाऱ्या शक्तींना मनसेचा पाठींबा – संजय राऊत

| TOR News Network |

Sanjay Raut Latest News : राज ठाकरे यांनी लोकसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा  दिला आणि आता  एका महिन्यात त्यांची भुमिका बदलली आहे. ते आता स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा करत आहेत.(Sanjay Raut On Raj Thackeray) काही पक्ष महाराष्ट्राच्या विरोधात भुमिका घेण्यासाठी बनले आहेत. मुंबई लुटणाऱ्या शक्तींना मनसे पाठीबा देत असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut Slams Raj Thackeray) यांनी केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. (Mp Sanjay Raut On Media)

संजय राऊत म्हणाले,  राज ठाकरे नुकतेच परदेशातून आलेत, बराच काळ ते परदेशात होते, त्यामुळे त्यांना राज्यात काय चाललंय हे समजून घ्यायला थोडा वेळ लागेल. काही दिवसांपूर्वी त्यांनी मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बिनशर्ट म्हणजे उघडा पाठिंबा दिला होता, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. बिनशर्त पाठिंबा दिला जणू काही महाराष्ट्रावर फार मोठे उपकार करण्यासाठी, मोदी आणि शहांचा जन्म झालाय.(Sanjay Raut On Pm Modi) ज्या महाराष्ट्रात मोदी शाहांना पाय ठेवू देणार नाही असं जे म्हणाले होते, त्यांना राज ठाकरेंनी बिनशर्ट पाठिंबा दिलाय. आणि आता एकाच महिन्यात त्यांची भूमिका बदलली. (Sanjay raut on raj thackeray changed role) ते आता 288-225  जागा लढणार आहेत. हे आश्चर्यकारक आहे, तो त्यांचा पक्ष, त्यांची भूमिका आहे.

महाराष्ट्रातील विधानसभेत अपशकुन करण्यासाठी महाराष्ट्रातील स्वाभिमानी पक्षांना ही पावलं उचलली जात आहेत का हे पाहावं लागेल, यावर आता फार बोलण्यात अर्थ नाही. काही व्यक्ती, काही संघटना, काही पक्ष हे सतत महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका घेण्यासाठीच निर्माण झालेल्या आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र असते तर पक्ष टिकला असता असे राज  ठाकरे म्हणाले, यावर संजय राऊत म्हणाले,  राष्ट्रवादी पक्ष पहिल्यापेक्षा खूप मजबूत आहे.(Sanjay Raut On NCP Sharad Pawar) शरद पवारांच्या पक्षाने कधी नव्हे ते इतकं मोठं यश मिळवलं.  पक्ष हलला नाही, 8 लोकसभेच्या जागा पवारांच्या नेतृत्त्वात जिंकल्या. हे पक्ष टिकल्याचे लक्षण आहे.   त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह काढून घेऊन सुद्धा आम्ही ताकदीने लढलो, (Sanjat Raut On Uddhav Thackeray) 9 जागा जिंकल्या. खरे पक्ष कोणते हे लोकांना माहिती आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

Latest Posts

Don't Miss