Wednesday, January 15, 2025

Latest Posts

हे महाराष्ट्र सरकार की गुजरातचे सरकार ?

आमदार रोहित पवारांची विधान भवन परिसरात टीका

Rohit Pawar Statement In Winter Assembly Nagpur 2023: राज्यातील सरकार हे म्हाराष्ट्र सरकार आहे ? की गुजरातचे सरकार आहे ? जणू अशीच टीका आमदार रोहित पवार यांनी सोमवारी सकाळी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.ते म्हणाले महाराष्ट्रातील मोठमोठे उद्योग गुजरातला हलिवण्यात येताहेत. त्यानंतरही हे सरकार झोपेत आहे. सध्याची स्थिती पाहता राज्य सरकार गुजरातच्या दावणीला बांधलेले दिसतेय.दरम्यान त्यांनी परिधान केलेले शिक्षक भरतीचा मुद्दा मांडणारे जॅकेट सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. (Mla Rohit Pawar Says Big Business from maharashtra are taking off to gujarat)

मुंबईत हिऱ्याचा व्यवसाय दीड लाख कोटींहून अधिकचा आहे. हा व्यवसाय सांभाळून ठेवण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु, गुजरात सरकार हा उद्योग अहमदाबादला घेऊन जाण्याचा घाट रचत आहे. गुजरातचे व्यापारी सातत्याने मुंबईतील हिऱ्यांच्या मोठ्या व्यापाऱ्यांशी संपर्कात आहेत. महाराष्ट्रातील उद्योग तिथे हलविण्यासाठी विविध प्रकारची आमिषे देण्यात येत आहेत. परंतु, राज्यातील नेते दिल्लीला मुख्यमंत्रीसह विविध पदे मागण्यात मश्गुल आहेत. उद्योग खाते झोपलेले आहे. हिरे व्यवसाय राज्यातून गुजरातला गेल्यास सुमारे दोन लाख लोकांचा रोजगार जाणार आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता राज्यातील भाजप सरकार गुजरातसाठी काम करतेय का, असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला.

६० हजार शिक्षक भरती करा

नको पोकळ्या घोषणा ६० हजार शिक्षक भरती करा, समूह शाळा दत्तक शाळा म्हणजे सरकारच्या पोकळ खेळ, गरीब विद्यार्थ्यांवर कशाला आणताय वाईट वेळ असा मजकूर लिहीलेले जॅकेट घालून आमदार रोहित पवार सोमवारी विधानभवनात आलेत. जॅकेटच्या माध्यमातून शिक्षक भरतीचा मुद्याकडे रोहित पवारांनी लक्ष वेधले आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या दोन अधिशनामध्ये शब्द दिला. पण, प्रत्यक्षात भरती झालेली नाही, असा दावा पवार यांनी केला. यावेळी त्यांनी समूह शाळेचा मुद्दादेखील मांडला.

Latest Posts

Don't Miss