Saturday, January 11, 2025

Latest Posts

आमदार नितीन देशमुख म्हणाले अमोल मिटकरी हे तीन वर्षांचे मेहमान कलाकार… त्यांच्या गावात साधा…

Mla Nitin Deshmukh On Amol Mitkari : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. मिटकरी यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केलेल्या टिकेनंतर त्यांचा देशमुख यांनी चांगलाच समाचार घेतला. (Mla Nitin Deshmukh Slams Ncp Leader Amol mitkari)

‘कोणी बापाचा पक्ष चोरलाय, तर कोणी काकाचा पक्ष चोरलाय’, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. संजय राऊतांच्या या टीकेला अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत, संजय राऊतांची तीन इंद्रिये निकामी झाली आहेत, अशी जहरी टीका केली होती. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आमदार मिटकरींचा किरीट सोमय्या करू, असा थेट इशाराच दिला आहे.

अकोल्यात महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना अमोल मिटकरी यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. संजय राऊत यांची तीन इंद्रिये निकामी झाली आहेत. मेंदू, जीभ आणि डोळे ही ती इंद्रिये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 44 आमदार 4 खासदार आणि अख्खा पक्ष अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे संजय राऊतांनी डोळ्याला झालेल्या मोतीबिंदुचे ऑपरेशन करावे. अजित पवार संजय राऊतांना उत्तर देणार नाहीत. आम्ही कार्यकर्ते त्यासाठी सक्षम आहोत, असे मिटकरी म्हणाले.

मिटकरी यांच्या या टीकेवर शिवसेना ठाकरे गटाचे बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. देशमुख म्हणाले, अमोल मिटकरी हे तीन वर्षांचे ‘मेहमान’ कलाकार आहेत. या ‘मेहमान’ कलाकाराने तीन वर्षे मौजमस्ती करावी.(Amol mitkari is 3 years mehman kalakar) या ‘मेहमान’ कलाकाराचे गावात सरपंच नाही. गावात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यही नाही. त्यामुळे मिटकरी यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करण्याचा प्रश्नच नाही. राहिला प्रश्न ऑपरेशन करायचा, तर आम्ही जर ऑपरेशन करायला लागलो तर मिटकरींचा किरीट सोमय्या व्हायला वेळ लागणार नाही.

महायुतीच्या मेळाव्यानंतर अकोल्यात आता राजकीय वातावरण तापले आहे. राऊत यांच्यावर केलेल्या टिकेवरून ठाकरे गट अधिक आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आणि शिवसेना ठाकरे गटात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. आगामी काळातही हे आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत अकोल्यात आमदार अमोल मिटकरी आणि भाजप यांच्यात शाब्दिक युद्ध चालायचे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहभागी झाल्यानंतर आता मिटकरी आणि भाजप दोघेही शिवसेना ठाकरे गटाच्या रडावर आले आहेत.

Latest Posts

Don't Miss