Saturday, January 11, 2025

Latest Posts

अमित देशमुखांचे मोठे वक्तव्य..म्हणाले मी काँग्रेस…..

| TOR News Network | Mla Amit Deshmukh Big News : सध्या काँग्रेस पक्षासह इतर पक्षात पडझड सुरु आहे. मोठे मोठे नेते भाजपाच्या वाटेवर आहे. नुकतेच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. अशात काँग्रेस मधील अनेक आमदार अशोक चव्हाण यांच्या सोबत जातील अशी जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे पुत्र व लातुरचे आमदार बंधू अमित देशमुख आणि आमदार धिरज देशमुख काँग्रेस सोडणार अशी उलटसुलट चर्चा सुरु आहे. यावर अमित देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे.(Mla Amit Deshmukh speaks on Congress)

लातूरमध्ये स्व. विलासराव देशमुख यांच्या स्मृतीसोहळ्यानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी अमित देशमुख यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. (Amit Deshmukh explained His Role ) ते म्हणाले की, मी काँग्रेसमध्येच बरा आहे. (I am good in Congress) मी कोणत्याच पक्षात जाणार नाही. यावेळी त्यांनी स्व. विलासराव देशमुखांची एक आठवणदेखील शेअर केली.(I will not join any party)

रक्तातील काँग्रेस कशी काढणार

अमित देशमुख म्हणाले की, स्व. विलासराव देशमुख यांच्यावरही काँग्रेस पक्षाने कावाई केली होती. त्यांना बेदखल करण्यात आलेलं होतं. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना, मला कुणी पक्षातून काढेल पण माझ्या रक्तातील काँग्रेस कशी काढणार?, असं उत्तर दिलं होतं. ही आठवण अमित देशमुखांनी शेअर केली.(Congresss in blood)

ते दिवस परत आणायचे आहेत

दरम्यान, आपल्याला यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांच्या काळामध्ये जशी परिस्थिती होती, ते दिवस परत आणायचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या विचारांशी ठाम राहावं, असा विश्वास अमित देशमुखांनी बोलून दाखवला.लातूरमध्ये रविवारी स्व. विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले.(In Latur The statue of Vilasrao Deshmukh was unveiled) या कार्यक्रमाला देशमुख कुटुंबाची हजेरी होती. तसेच यावेळी राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी रितेश देशमुख भावुक झाल्याचं बघायला मिळालं.(Vilasrao Deshmukh Statue unveiled)

रितेश झाला भावूक

”साहेबांना (विलासराव देशमुख) जाऊन आज जवळपास 12 वर्ष झाली. त्यांची उणीव नेहमीच भासते. पण ही उणीव आम्हाला कधी भासू नये म्हणून आमचे काका नेहमीच आमच्या पाठिशी उभे राहिले.(Our Kaka Always Stand Behind us) काकांना मला हे सांगता आलं नाही, पण मी आज सर्वांसमोर त्यांना सांगतो की, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. (Kaka I Love u very much )काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे, याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवर तुम्ही पाहू शकता.” असं म्हणत रितेश यांनी भावनांना वाट मोकळी करुन दिली. (Ritesh Deshmukh Speech)

Latest Posts

Don't Miss