Saturday, January 11, 2025

Latest Posts

तब्बल सात वर्षांनी सापडले विमानाचे अवशेष

Missing Air Force Plane Found : भारतीय वायूदलाचं AN-32 हे विमान जवळपास सात वर्षांपूर्वी सर्वच रडारवरून गायब झालं होतं. या विमानाचा शोध घेण्यासाठी तेव्हा जवळपास २८ जहाज आणि एक मोठी पाणबुडी काम करत होते. पण या विमानाचा काहीच थांगपत्ता लागला नाही. पण अखेर सात वर्षांनंतर या विमानाचे अवशेष चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यापासून तब्बल ३०० किलोमीटर आत समुद्राच्या अगदी तळाशी सापडले आहेत. (Airforce plane missing in 2016 found in 2024) ही भारताच्या सर्वात मोठ्या ठरलेल्या शोधमोहिमांपैकी एक मानली जाते. आता हे अवशेष सापडल्यानंतर या विमानाचा अपघात नेमका कसा झाला, याचा तपास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. (After 7 years plane found in deep sea)

नेमकं घडलं काय?

चेन्नईतील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओशियन टेक्नोलॉजी अर्थात NIOT ही संस्था समुद्रातील अनेक संशोधन प्रकल्प राबवत असते. अशाच एका अंडरवॉटर वेहिकल अर्थात एयूव्हीची चाचणी करत असताना त्यांना एएन-३२ चे काही अवशेष सापडले. नॉर्वेहून आयात करण्यात आलेली ही एयूव्ही यांनी पहिल्यांदाच चाचणी करण्याच्या हेतूने समुद्रात जवळपास ३४०० मीटरपर्यंत खोलपर्यंत नेली होती. सुरुवातीला तिधे काही धातूचे तुकडे आढळून आले. त्यावरून त्यांना वाटलं की हे एखाद्या जहाजाचे अवशेष असावेत. पण हळूहळू गोष्टींचा सविस्तर उलगडा होत गेला.

भारतीय वायूदलाचं AN-32 हे विमान जवळपास सात वर्षांपूर्वी सर्वच रडारवरून गायब झालं होतं. या विमानाचा शोध घेण्यासाठी तेव्हा जवळपास २८ जहाज आणि एक मोठी पाणबुडी काम करत होते. पण या विमानाचा काहीच थांगपत्ता लागला नाही. पण अखेर सात वर्षांनंतर या विमानाचे अवशेष चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यापासून तब्बल ३०० किलोमीटर आत समुद्राच्या अगदी तळाशी सापडले आहेत. ही भारताच्या सर्वात मोठ्या ठरलेल्या शोधमोहिमांपैकी एक मानली जाते. पण तेव्हा या शोधमोहिमेला पूर्ण अपयश आलं होतं. आता हे अवशेष सापडल्यानंतर या विमानाचा अपघात नेमका कसा झाला, याचा तपास करण्याचा प्रयत्न केला जात आहे.(Indian air force plane found )

Latest Posts

Don't Miss