Saturday, January 18, 2025

Latest Posts

वर्षावर मध्यरात्री बैठक : महायुतीत मोठ्या हालचाली

| TOR News Network |

Mahayuti Latest News : आगामी विधानसभा निवडणुक बघता सर्व राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. (Vidhansabha Election 2024) एकीकडे शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौरा केला. त्यात महाविकास आघाडीची रणनीती ठरवण्यात आली. (Mahayuti Election Strategy) तर दुसरीकडे मुंबईत महायुतीने गुरुवारी मध्यरात्री बैठक घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत तिन्ही पक्षाची बैठक झाली.(Mahayuti Late Night Meeting) सुमारे अडीच तास तिन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत खलबते झाले.

वर्षा बंगल्यावरील बैठक गुरुवारी रात्री ११ ते १.३० पर्यंत सुरु होती. (Mahayuti Late Night Meeting On Varsha ) या बैठकीत विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरल्याची माहिती मिळाली आहे. मेळावे, सभा आणि संवाद दौरे आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक मतदार संघावर लक्ष ठेऊन रणनीती तयार केली जाणार आहे. येत्या २० तारखेपासून तिन्ही नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार रात्री ११ वाजता पोहचले. त्यानंतर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु झाली. (Mahayuti Discusion on Vidhansabha at varsha) या बैठकीत ७ विभाग आणि २८८ विधानसभेत एकाच दिवशी विभागनिहाय संवाद दौरे, लाभार्थी यात्रा व सभा आयोजित करण्याबाबत निर्णय झाला. तसेच ७ विभागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा होणार आहेत. २० ऑगस्ट रोजी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कोल्हापूर येथून जाहीर सभेने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकंले जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलाच झटका बसला होता.(Mahayuti Shocked at loksabha) या निवडणुकीत महायुतीला ४८ पैकी केवळ १७ जागांवर विजय मिळवता आला होता. महाविकास आघाडीने ३० जागा आणि महाविकास आघाडीतील बंडखोर अशा ३१ जागांवर वर्चस्व निर्माण केले होते. त्यामुळे आता महायुतीने अधिक जोराने काम सुरु केले आहे.

Latest Posts

Don't Miss