Thursday, January 16, 2025

Latest Posts

जागा वाटपासंदर्भात अमित शाह यांची मध्यरात्री बैठक

| TOR News Network | Amit Shah Latest News Loksabha Election : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. (Amit Shah in Maharashtra) होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणूकांसाठी त्यांनी  महाराष्ट्रात रणशिंग फुंकले.या दौऱ्यात महाराष्ट्रातील विरोधक शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.तर राज्यातील जागा वाटपाचा वाद मिटवण्यासाठी त्यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.(Amit Shah Took mid Night Meeting)

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २२ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १६ जागा हव्या होत्या. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली होती. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी बैठक घेतली. बैठकीत भाजपकडून झालेले सर्वेक्षण, उमेदवार निवडून येण्याची क्षमता हे मुद्दे लक्षात घेऊन जागा वाटप करण्याचे अमित शाह यांनी सांगितले. भाजप नेते देखील काही जागांसाठी अडून बसले असतील आणि त्या ठिकाणी मित्रपक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो तर भाजपनेही हट्ट सोडावा. जागा वाटपात कोणावर अन्याय होणार नाही. ४०० चे टार्गेट घेऊन कामाला लागा, असे अमित शाह यांनी सांगितले. ४८ जागा वाटप कसे करायचे यासंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचे समजते.

७ मार्चला दुसरी यादी

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. परंतु महाराष्ट्रातील जागा वाटप न झाल्यामुळे त्यामध्ये महाराष्ट्रातील एकाही मतदारसंघाचा समावेश नव्हता. त्यानंतर जागा वाटपाचा तिढा अमित शाह यांच्या मध्यस्थीनंतर सुटल्याचे समजते. यामुळे येत्या ७ मार्चला भाजपकडून दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या यादीत महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ आणि उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Latest Posts

Don't Miss