Sunday, January 12, 2025

Latest Posts

मी ठाण्यातून लढण्यास तयार : Aaditya Thackerey

आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान

Aaditya Thackeray Latest News :मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एक-दीड वर्षांपासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा. माझ्यासमोर वरळीतून लढावे अन्यथा मी त्यांच्याविरुद्ध ठाण्यातून लढायला तयार आहे, असे थेट आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले. (I Am ready to stand in elections from Thane says mla Aditya Thackeray )

बोरवली-विरार या रेल्वेसाठी काही कांदळवन हलवायचा प्रयत्न होत आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची मला माहिती मिळाली. विशेष म्हणजे हे कांदळवन गडचिरोलीला हलविणार असल्याची माहिती आहे. हे तर जखम मांडीला आणि मलम शेंडीला, असा टोला त्यांनी लगावला. धारावी विकासाच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले,‘धारावीच्या विकासावर सरकारचे नियंत्रण असायला हवे. सरकारच्या कुठल्या तरी मित्राचा विकास होऊ नये. जनतेचा विकास व्हायला हवा. ज्या प्रकारच्या सवलती आपण त्यांना देतोय ते पाहता सरकारने हा प्रकल्प पूर्ण करावा.

Latest Posts

Don't Miss