Saturday, January 11, 2025

Latest Posts

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमित शाह, राहूल गांधीं, गडकरी,फडणवीस यांच्या विदर्भात सभा

| TOR News Network | Maharashtra Lok Sabha Election Phase 2 : लोकसभा निवडणूकीच्या दुस-या टप्प्यातील मतदान येत्या 26 एप्रिलला आहे. यामध्ये हिंगोली, वर्धासह पश्चिम विदर्भातील यवतमाळ – वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. (lok sabha election second phase) परिणामी आज (बुधवार) सायंकाळी सहा नंतर आठ मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मात्र उमेदवारांना बळ देण्यासाठी दिग्गांच्या सभा विदर्भात होणार आहेत.(top leader to conduct public meeting in vidarbha)

वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस विरुद्ध एनसीपी शरद पवार गटाचे अमर काळे यांच्यात तगडी लढत होणार आहे.(In Wardha amar kale vs ramdas tadas) तडस यांच्या प्रचारार्थ आज वर्धा लोकसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सभा होणार आहे.(dcm fadnavis in wardha for meeting) दुपारी पुलगाव येथे तर 4 वाजता वर्धेत सभा होईल.आज अमर काळे यांचा वर्धा शहरासह आजूबाजूच्या गावात प्रचार दौरा आहे. त्यांच्या समवेत माजी मंत्री व आमदार रणजित कांबळे हे देखील आहेत.

बुलढाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे निवडणुक लढवत आहेत तसेच अपक्ष रविकांत तुपकर सुद्धा झुंज देत आहेत.या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जाधव यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची चिखली येथे दुपारी सभा होणार आहे. (nitin gadkari in chikhli)

अमरावती मतदारसंघात भाजपच्या नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखडे तसेच प्रहारचे दिनेश बुब आणि आनंदराज आंबेडकर यांच्यात लढत असेल. (Navneet rana vs balwant wankhade in amravati)आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अमरावती येथील सायन्स कोअर मैदानात सभा होणार आहे. काँग्रेस नेते राहूल गांधी यांची देखील अमरावती येथे सभा होणार आहे.(rahul gandhi in amravati)

यवतमाळ – वाशीम मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख यांच्यात लढत होत आहे तर बसपाकडून हरिभाऊ राठोड रिंगणात आहेत.(sanjay deshmukh vs rajshri patil in yavatmal washim) अकोल्यात वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, भाजपचे अनुप धोत्रे आणि कॉंग्रेसचे अभय पाटील अशी लढत असणार आहे. या बरोबरच हिंगोली, परभणी आणि नांदेड येथे आज प्रचाराचा अंतिम टप्पा आहे.

Latest Posts

Don't Miss